संगमनेरात घरफोडी करून लाखोंची लुट
संगमनेर: संगमनेर शहरातील अभंग मळा येथील संजय मोहन गोडसे यांच्या घरात घुसून अज्ञात चोरट्यांनी रोख रकमेसह सोन्याचे दागिने चोरून पोबारा केला केल्याची घटना मंगळवार दिनांक १२ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री घडली. आठ दिवसापूर्वी खांडगाव शिवारातील बालोडे मळ्यातील रमेश भाऊसाहेब कोठवळ यांच्या घरात घुसून त्यांना मारहाण करत चोरट्यांनी अशाच पद्धतीने ऐवज लांबविला होता. आठ दिवसांत दुसर्यांदा घरफोडीची घटना झाल्याने आता घरफोड्यांचा तपास लावणे पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
You May Also Like: Bollywood Actresses Priyanka Chopra, Mallika successful adult Movie
संजय मोहन गोडसे हे आपल्या कुटुंबासमवेत अभंग मळा या ठिकाणी राहत आहे. ते दीपावलीनिमित्त शनिवार १० नोव्हेंबर रोजी पुण्याला गेले होते. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास गोडसे यांच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला व घरातील रोख रक्कम व ३५ हजार किमतीचे दीड तोळे सोन्याचांदीचे दागिने चोरून पोबारा केला आहे. यावेळी चोरट्यांनी गोडसे यांच्या शेजारच्याहि घरांना बाहेरून कडी कोंडा लावून घेतला होता. मंगळवारी सकाळी शेजाऱ्यांनी पहिले असता त्यावेळी गोडसे यांच्या घराचे कुलुप तुटलेल्या अवस्थेत दिसले व नंतर घरामध्ये चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. या घटनेची माहिती शहर पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
याप्रकरणी संजय गोडसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यान विरोधात गुन्हा रजिस्टर दाखल केला आहे. पुढील तपास अभय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर हे करीत आहे.
Website Title: sangamner taluka news Loot of lakhs of rupees by burglary in Sangamner
आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा. किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.
आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजच संपर्क करा. 9850540436
मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा
प्रमोटेड बातम्या: