संगमनेर: माहुली शिवारातील एकल घाटामध्ये उलटली स्विफ्ट कार
संगमनेर: माहुली शिवारातील एकल घाटामध्ये उलटली स्विफ्ट कार
संगमनेर: काळ आला होता पण वेळ आली नव्हती या उक्तीप्रमाणे स्विफ्ट कार उलटूनही केवळ सीट बेल्ट लावलेले असल्यामुळे दोघे जण बालंबाल बचावाल्याची घटना संगमनेर तालुक्यातील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील माहुली शिवारातील एकल घाटात गुरुवार दिनांक २५ ऑक्टोबर रोजी दुपारी पावणे बारा वाजेच्या सुमारास घडली यात कारचेही मोठ्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
You May Also Like: Bollywood Actresses Priyanka Chopra, Mallika successful adult Movie
स्विफ्ट कार क्रमांक एमएच १४ बीएक्स २९८५ हिच्यावरील चालक आमित मच्चीन्द्र कणसे रा. मोशी जि. पुणे व त्यांच्यासोबत असणारे मिलिंद प्रभाकर शेटे रा. निगडी जि. निगडी हे पुणे येथून आळेफाटा मार्गे संगमनेरच्या दिशेने जात होते. गुरुवारी दुपारी पावणे बाराच्या सुमारास स्विफ्ट कार माहुली शेजारी असणाऱ्या नवीन एकल घाटातून जात असताना अचानक कारचा पुढील डाव्या बाजूचा टायर फुटला. कणसे यांनी कार आवरण्याचा प्रयत्न केला मात्र ती उलटली. पण कणसे यांनी सीट बेल्ट लावल्यामुळे बालंबाल बचावले. अपघात झाल्याचे पाहून आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी भेट घेतली. तसेच महामार्गाचे पोलीस संजय वाघमारे, जानकीराम खेमनर, साईनाथ दिवटे, प्रकाश मडके, अरविंद गिरी,नारायण ढोकरे, योगीराज सोनावणे हेही घटनास्थळी आले. आणि कारमधील कणसे व शेटे या दोघानाही कारमधून सुखरूप बाहेर काढले. सीट बेल्ट मुळे कणसे हे बालंबाल बचावले.
Website Title: sangamner Taluka News Inverted Swift car in single deficit
आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा. किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.
आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजच संपर्क करा. 9850540436
मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा