संगमनेर तालुक्यात मुसळधार पाउस, पिकांचे नुकसान
संगमनेर(Sangamner): संगमनेर तालुक्यात गुरुवारी रात्री जोराचा मुसळदार पाउस झाला.या पावसाने बाजरी व मका या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. बऱ्याच ठिकाणी झाडे कोसळल्याची आढळून आली.
संगमनेर शहरातही मुसळदार पावसाने हजेरी लावली. बऱ्याच दिवसांपासून थांबलेला पाउस पुन्हा एकदा सुरु झाल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
संगमनेर तालुक्यातील सावरगावतळ येथे जोरदार पाउस झाल्याने उभे असलेले बाजरी व मका पिक भुईसपाट झाले आहे. यात शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
संगमनेर शहरात रात्रभर दमदार पाउस झाल्याने झाल्याने रस्ते धुवून निघाले आहेत. कचरा व घाण साफ झाले आहे. संगमनेरात झालेल्या मुसळदार पावसाने शेतीला मोठा फायदा झाला आहे. पावसाची गरज असताना जोरदार पाउस झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानचे वातावरण पसरले आहे.
वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.
Website Title: Sangamner taluka Heavy rain