Home संगमनेर Sangamner: संगमनेर तालुक्यात ग्रामपंचायतीवर थोरातांचे वर्चस्व

Sangamner: संगमनेर तालुक्यात ग्रामपंचायतीवर थोरातांचे वर्चस्व

Sangamner taluka grampanchayat election result

संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यात महाविकास आघाडीचे वर्चस्व राहिले आहेत तर बऱ्याच ग्रामपंचायतीत भाजप गटाला धूळ चारली आहे. संगमनेर तालुक्यातील अनेक ठिकाणी नामदार थोरातांच्या दोन  समर्थकांमध्ये ही निवडणूक रंगली. प्रशासनाकडून सुसज्ज असे नियोजन करण्यात आले होते.

संगमनेर तालुक्यातील ९४ ग्रामपंचायतीपैकी ९० ग्रामपंचायतची मोजणी शारदा विद्यालयात सकाळी १० वाजता सुरु करण्यात आली. मतमोजणीसाठी गावानुसार फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार सकाळी १० वाजता ओझर, सांगावी, रायतेवाडी, समानापुर, डिग्रस, खर्शिंदे, झोळे या गावांचा निकाल घोषित करण्यात आला. पुढील अध्या तासाने पुढील गावांची मतमोजणी करण्यात आली. तर तालुक्यातील आश्वी विभागात विखे थोरात गटात चुरशीची राशीची लढाई पाहण्यास मिळाली. यात अनेक धक्कादायक निकाल लागले असून थोरात गटाने विखे गटाला अनेक ग्रामपंचायतीत धूळ चारली.

यात चिंचपूर येथे विखे गटाला ३५ वर्षानंतर धक्का देत थोरात गटाने एकहाती सत्ता मिळविली. तर खळी ग्रामपंचायतीवर विखे थोरात यांच्यात समझोता एकमताने सत्ता आली.

डिग्रस, कनोली, दाढ खुर्द, प्रतापपूर, औरंगपुर मनोली या गावांत विखेनी झेंडा फडकाविला.

ओझर बुद्रुक ग्रामपंचायतीवर नामदार थोरात गटाचे निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित झाले.

चानेगाव, झारेकाठी आणि शेडगाव या  ग्रामपंचायतमध्ये थोरात गटाने विजय मिळविला.

निमोण ग्रामपंचायतीत ९ पैकी ७ जागांवर शिवसनेने आघाडी घेतली. बाभळेश्वर येथे विखे गटाने थोरात गटाला धक्का देत सत्ता मिळविली.

डिग्रस, वरुडी पठार, हिवरगाव पावसा या ठिकाणी विखे गटाने थोरातांना शह दिला.

ओझर रायतेवाडी, सांगवी, डिग्रस समनापूर, झोळे, खर्शिंदे, कनोली, मिर्झापूर, कुरण, पिंपळगाव देपा, पिंपळगाव माथा, संगमनेर खुर्द या गावांवार थोरातांनी झेंडा उभारला.

पठार भागातही काही ठिकाणी शिवसेना भाजपाने थोरातांना धक्का देत ग्रामपंचायतीवर भगवा फडकाविला. यात नांदूर खंदर माळ येथे शिवसेनेने भगवा फडकाविला.  

Web Title: Sangamner taluka grampanchayat election

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here