संगमनेर तालुक्यात वॅगनर कारची दुचाकीला धडक, चालक फरार, पोलिसांनी गाडी तपासली असता तर काय?
संगमनेर| Sangamner: संगमनेर तालुक्यातील वडगाव फाट्यावर वॅगनर कारने एका मोटारसायकलला धडक दिली असता अपघात (Accident) घडला. या अपघातानंतर वाहनचालक फरार झाला. पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी जाऊन वाहनाची तपासणी केली असता गाडीत गुटखा व तंबाखूजण्य पदार्थ मिळून आले. यामध्ये ३ लाख १७ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला आहे. याप्रकरणी एका जणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
1 लाख रुपये किमतीची मारुती सुझुकी कंपनीची वॅगनर कार क्रमांक एम. एच. 02 जे. पी 4913 मध्ये पांढर्या रंगाच्या 13 गोण्यामध्ये गुटखा 1 लाख 65 हजार 360 रुपये किमतीचा तसेच एका गोणीमध्ये हिरा पानमसाला गुटखा 8040 रुपये किमतीचा, हिरवट रंगाच्या 7 गोण्यांमध्ये रॉयल 717 तंबाखूचे पिवळ्या रंगाचे एकूण 1484 पाऊच 44 हजार 520 रुपये किमतीचा असा एकूण 3 लाख 17 हजार 920 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
वडगावपान ते तळेगाव जाणार्या रोडवर वडगावपान फाट्यावर एका वाहनातून बेकायदेशिररित्या गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक होत होती. या वाहनाने एका मोटारसायकलला धडक दिल्याने वाहनचालक फरार झाला. अपघाताची माहिती सरपंचांनी तालुका पोलिसांना दिली. माहिती मिळताच तालुका पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ मिळून आले.
याबाबत पोलीस नाईक नितीन शिंदे यांनी फिर्याद दाखल केली आहे. आरोपी अफरोज उर्फ आफ्रीदी रफिक पठाण (रा. नाईकवाडपुरा, संगमनेर) याच्याविरुद्ध गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक ए. के. दातीर करत आहेत.
Web Title: Sangamner taluka Accident and smuggled from the vehicle