धक्कादायक: संगमनेर तालुक्यात तब्बल ५५ करोनाबाधित
संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यात तब्बल ५५ करोनाबाधित आढळून आले आहेत. मंगळवारी सायंकाळी उशिरा प्राप्त अहवालात खासगी व अॅटीजेन टेस्टद्वारे ३६ रुग्ण आढळून आले आहेत. तर बुधवारी सकाळी शासकीय प्रयोगशाळेच्या अहवालातून १९ करोनाबाधित आढळून आले आहेत.
मंगळवारी सायंकाळी उशिरा प्राप्त अहवालात खासगी १२ रुग्ण यामध्ये शहरातील सुतारगल्ली येथे ५७ वर्षीय पुरुष, अभिनव नगर ५६ वर्षीय पुरुष, ५४ व २५ वर्षीय महिला, मार्केट यार्ड २२ वर्षीय महिला, साळीवाडा ४२ वर्षीय महिला, जनतानगर ५७ वर्षीय व्यक्ती, आश्वी बुद्रुक येथे २५ वर्षीय तरुण, पिंपळगाव कोन्झिरा ५५ वर्षीय पुरुष, रहिमपूर येथे ४८ व ५४ वर्षीय पुरुष,औरंगपुर येथे ५५ वर्षीय महिला, वडगाव पान येथे ६१ वर्षीय पुरुष, खंदरवाडी येथे ७७ वर्षीय वृद्ध करोनाबाधित आढळून आले आहेत.
अॅटीजेन टेस्टद्वारे २४ रुग्ण आढळले यामध्ये राजापूर येथे ४८,४५,२४ वर्षीय महिला, संगमनेर खुर्द ३० वर्षीय तरुण, निमगाव टेंभी ४७ वर्षीय महिला, कोल्हेवाडी ४५ वर्षीय महिला तर चंदनापुरी येथे ४५,३७,२५,२० वर्षीय पुरुष, ६०,३२,४०,३२ वर्षीय महिला, १३,१२ वर्षीय बालिका, ३ वर्षीय बालक त्याचबरोबर साकुर येथे ५६ व ४५ वर्षीय पुरुष, ५० व २५ वर्षीय महिला, कुरकुटवाडी ६२ वर्षीय महिला असे एकूण ३६ पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले आहेत.
आज बुधवार सकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार १९ करोनाबाधित आढळून आले आहेत. यामध्ये शहरातील नंदनवन वसाहतीतील ६५ वर्षीय महिला, माळीवाडा व खंडोबागल्ली येथे ७० व ६५ वर्षीय व्यक्ती, साळीवाडा येथे ४९ वर्षीय व्यक्ती, ३० वर्षीय महिला, कुरण रोड ६७ वर्षीय व्यक्ती, घासबाजार ३६ वर्षीय महिला, १० व ५ वर्षीय बालिका, गोल्डन सिटी परिसरात २१ वर्षीय तरुण, राहणेमळा २९ वर्षीय तरुण, चंदनापुरी येथे ४१ वर्षीय तरुण, चिकणी येथे २८ वर्षीय तरुण, मेंढवन येथे ६५ वर्षीय व्यक्ती, घुलेवाडी येथे ५० वर्षीय व्यक्ती, पानोडी येथे ५५ वर्षीय महिला, घारगाव येथे ५५ वर्षीय व्यक्ती, जवळे बाळेश्वर येथे २९ वर्षीय तरुण, साकुर येथे ६५ वर्षीय महिला यांना करोनाची लागण झाली आहे. तालुक्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या १४५० इतकी झाली आहे.
Web Title: Sangamner taluka 55 corona infected