Sangamner: संगमनेर तालुक्यात २२ करोना बाधितांची वाढ
संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यात मंगळवारी नवीन 22 रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये ग्रामीण भागातील 18 तर शहरातील 4 जणांचा समावेश आहे. तालुक्याची एकूण बाधितांची संख्या 3985 इतकी झाली आहे.
आज प्राप्त झालेल्या अहवालात गोविंदनगर येथील 20 वर्षीय तरुणी, परदेशपूरा येथे 28 वर्षीय पुरुष, इंदिरानगर येथे 30 वर्षीय पुरुष, जनतानगर येथे 66 वर्षीय व्यक्ती असे बाधित आढळून आले आहेत.
तर ग्रामीण भागातून गुंजाळवाडी येथे 60 वर्षीय पुरुष, निळवंडे येथे 64 वर्षीय पुरुष, जोर्वे येथे 47 वर्षीय व्यक्ती, मिरपूर येथे 25 वर्षीय तरुण, डोंगरगाव येथे 62 वर्षीय पुरुष, रहिमपूर येथे 87 वर्षीय पुरुष, कनोली येथे 44 वर्षीय पुरुष, पेमगिरी येथे 26 वर्षीय महिला, 12 वर्षीय मुलगा, सारोळे पठार येथे 68 वर्षीय पुरुष, 19 वर्षीय तरुण, जवळे बाळेश्वर येथील 33 वर्षीय तरुण, चिखली येथील 67 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 35 वर्षीय तरुण, घुलेवाडी येथे 55 वर्षीय महिला, 48 वर्षीय पुरुष, पिंपळगाव कोंझिरा येथे 40 वर्षीय महिला, सावरगाव तळ येथे 56 वर्षीय पुरुष असे बाधित आढळून आले आहेत.
महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.
See: Latest Entertainment News, Ahmednagar News, and Latest Marathi News Live
Web Title: Sangamner Taluka 22 corona infected yesterday