संगमनेर तालुक्यात शनिवारी आणखी २१ करोनाबाधित
संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यात शनिवारी आणखी २१ जणांची भर पडली आहे. शनिवारी रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालात खासगी प्रयोगशाळेतून ५ तर रॅपिड अॅटीजेन टेस्ट मधून १६ अहवाल प्राप्त झाले आहेत.
संगमनेर शहरातील घासबाजार येथील ७७,५१,६८ वर्षीय महिला व ७२ वर्षीय पुरुष, इंदिरानगर येथे ८१ वर्षीय पुरुष, ७१ वर्षीय महिला, मालदाड रोड येथे २९ वर्षीय महिला, शहरातील पोलिसांची वसाहत असणाऱ्या अकोले रोड वरील पोलीस कॉलनी येथील २३ व २२ वर्षीय तरुणी, संजय गांधी नगर येथील ३२ वर्षीय व्यक्ती, लाल तारा हैसिंग सोसायटी येथील २१ व १८ वर्षीय तरुणी, १५ वर्षीय मुलगा,४३ वर्षीय पुरुष, विद्यानगर येथील ६० वर्षीय महिला, असे १५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच सुकेवाडी येथील ६५ वर्षीय पुरुष, घुलेवाडी येथील २३ वर्षीय तरुण, नांदूर खंदारमाळ २७ वर्षीय तरुणी, खराडी येथील २७ वर्षीय तरुण आज नव्यानेच खांबां येथील ५५ वर्षीय पुरुष, चंदनापुरी येथे ७९ वर्षीय पुरुष असे सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. संगमनेर तालुक्याची करोनाबाधितांची एकूण संख्या ७७९ झाली आहे.
वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.
Website Title: Sangamner taluka 21 coronavirus infected