संगमनेर: रस्त्याच्या वादातून आत्महत्या, पाच जणांवर गुन्हा दाखल
संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यातील झोळे येथे शेताकडे जाणाऱ्या वहिवाटच्या रस्त्याच्या कारणावरून भाऊबंद यांनी एका वयोवृद्ध व्यक्तिला मानसिक व शारीरिक त्रास दिल्याने या वेळोवेळी दिलेल्या त्रासाला कंटाळून विषारी औषध सेवन केले. ही घटना शनिवारी ३ ऑक्टोबर रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास घडली. सोमवारी या व्यक्तीचे उपचार सुरु असताना निधन झाले.
बाछाव धोंडीबा खर्डे वय ७० रा. झोल असे या मयत व्यक्तीचे नाव आहे.
याप्रकरणी या व्यक्तीच्या मुलाने संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली या फिर्यादीवरून पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
मुलगा सूर्यभान बच्छाव खर्डे यांच्या फिर्यादीवरून नानासाहेब भिका खर्डे, सुधीर भिका खर्डे, सुनंदा सुधीर खर्डे, अभिषेक बाळू खर्डे, पूजा बाळू खर्डे या पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
बच्छाव खर्डे हे त्यांची पत्नी यांच्यासमवेत झोळे येथे राहत होते. त्यांच्या शेतात जाण्या येण्याच्या असलेल्या रस्त्यावरून मागील दहा वर्षापासून वाद सुरु आहेत असे फिर्यादीत म्हंटलं आहे.
महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळावा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.
See: Latest Entertainment News, Latest Ahmednagar News in Marathi, and Latest Marathi News
Web Title: Sangamner Suicide from a street dispute