संगमनेर: वाळूतस्काराने वाहन थेट आईसह मुलाच्या अंगावर घातले
संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यातील प्रतापपूर येथे शुक्रवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनाने घरासमोर झोपलेल्या अवस्थेत असलेल्या महिला व तिच्या चार वर्षाच्या मुलाच्या अंगावर वाहन घालून जखमी केल्याची घटना घडली आहे.
प्रतापपूर गावात सुनिता सुनील पवार वय ३०, दीपक पवार वय ४ अशी जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी सुनीता पवार यांनी आश्वी पोलीस ठाण्यात बाळू राजेंद्र नागरे तक्रार दाखल केली आहे.
याबाबत माहिती अशी की, शुक्रवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास प्रतापपूर येथील प्रवरा नदीपात्रातून वाळूचा उपसा सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस आल्याची माहिती वाळूतस्करांना मिळाल्याने नदीपात्रात पळापळ सुरु झाली. यांमधील एकाने थेट घरासमोर झोपलेल्या सुनीता सुनील पवार व तिच्या चार वर्षीय मुलाच्या अंगावरून वाहन गेल्याने ते जखमी झाले आहे. आश्वी पंचक्रोषित वाळू तस्करांनी थैमान घातले असून मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा होत आहे. वाळू तस्करांवर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिक करीत आहे.
Web Title: Sangamner sandbag hit the vehicle directly on the child’s body with the mother