Home अहिल्यानगर लसीकरण केंद्रावर महिला अधिकाऱ्याला धक्काबुक्की

लसीकरण केंद्रावर महिला अधिकाऱ्याला धक्काबुक्की

Pushing a female officer at the vaccination center

अहमदनगर | Vaccination: नगर तालुक्यातील निंबळक येथील लसीकरण केंद्रावर धक्कादायक प्रकार घडला आहे. ग्रामपंचायत सदस्यांनी व इतर चार नागरिकांनी केंद्रावर गोंधळ घालत महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला आहे. यावेळी नोंदणी रजिस्टरसुधा फेकून देण्यात आले. ही घटना गुरुवारी दुपारी चार वाजता घडली.

आरोग्य अधिकारी रुपाली शंकर मोहरकर यांनी एमआयडी सी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र पोपट कोतकर, दत्तू गुलाब कोतकर, गोरक्ष मुरलीधर कोतकर, सुरेश बाबू कोतकर सर्व रा, निंबळक यांच्याविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निंबळक येथील आरोग्य उप केंद्रात लसीकरण सुरु असताना तेथे गर्दी झाली होती. यावेळी चौघांनी येवून केंद्रावर धक्काबुकी व शिवीगाळ केली. नोंदणी रजिस्टर फेकून दिले असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक कणसे हे अधिक तपास करीत आहे.  

Web Title: Pushing a female officer at the vaccination center

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here