संगमनेर: गुंजाळवाडी परिसरात दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद
संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी परिसरात हॉटेल रानजाईजवळ बोगद्याजवळ दरोड्याच्या तयारीतील टोळीला जेरबंद करण्यात संगमनेर शहर पोलिसांना यश आले आहे.
ही कारवाई बुधवारी रात्री दोन वाजेच्या सुमारास करण्यात आली आहे. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये ८ लाख ८० हजार २६० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. या टोळीतील तीन आरोपींना अटक करण्यात आली असून दोन जण फरार झाले आहेत.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, संगमनेर पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांना रस्त्यात अडवून लुट करणारी टोळी असल्याची खात्रीदायक माहिती मिळाली. यानुसार पोलीस अधिकारी यांनी पथकाला पाचारण करण्यात आले. संगमनेर तांबे हॉस्पीटल ते गुंजाळवाडी रोडवर हॉटेल रानजाईजवळ नाशिक पुणे हायवे येथील बोगद्यात अंधारात पांढरया रंगाच्या कारमध्ये पाच जण हे दबा धरून बसले होते. पोलीस आल्याचे समजताच हे शेतात पळून जाण्याच्या तयारीत होते. मात्र पोलिसांनी मोठ्या शिथापीने तिघा जणांना पकडले मात्र दोघे जण हे पळून जाण्यात यशस्वी झाले. यावेळी असिफ अन्सार पठाण वय ३१ रा. नाईकवाडपुरा, भूषण बंडू थोरात रा. घुलेवाडी, तन्वीर कादिर शेख रा. दिल्ली नाका या तिघांना अटक करण्यात आली आहे. तर अमोल जोंधळे रा. गुंजाळवाडी आणि बबलू रा. संगमनेर हे दोघे जण पसार झाले आहेत.
याप्रकरणी पोलीस नाईक महादेव हांडे यांनी दिलेल्या फिर्यादिवारीन संगमनेर शहर पोलीस ठाण्यात वरील पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत क्रेटा कार, मोबाईल, हातोडी, दोरी, मिरची पावडर असे साहित्य जप्त करण्यात आले आहे. यांच्याकडून एकूण ८ लाख ८० हजार २६० रुपयांचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक रोहिदास माळी हे करीत आहे.
Web Title: Sangamner Robbery gang arrested in Gunjalwadi area