जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रामवाडी(मालूंजे) शाळेची पंढरीची दिंडी संपन्न
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रामवाडी(मालूंजे) शाळेची पंढरीची दिंडी संपन्न
आषाढवारी …आयुष्याला सकारात्मकतेचा साज चढविणारा सोहळा.शाळेच्या बालवारकऱ्यांबरोबर अंगणवाडीची मुलेही सहभागी झाली होती.या बालवारकऱ्यांची दिंडी एकनाथ गोसावी यांचे घरी वळवून विद्यार्थ्यांना चहा व केळी वाटप केली व विठ्ठल रुक्मिणीचे व पालखीचे पूजन केले.
दिंडीच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक केशव घुगे ,उपाध्यापिका श्रीमती सुरेखा आंधळे तसेच अंगणवाडी सेविका संगीताताई खरात,योगीताताई खरात यांनी विशेष परिश्रम घेतले.

पंढरपूरच्या दिशेने चालणारया पावलांना अगतिक ओढ असते चंद्रभागेच्या तीराची …आस असते सावळ्या विठुरायाच्या दर्शनाची ..भक्ती रसात चिंब न्हाताना ..ग्यानबा तुकारामाचा गजर करत .. निळ्या नभातून पाझरणाऱ्या रिमझीमत्या पावसाला अंगावर घेत ही वारी चालत राहते ऐका शिस्तीने ..एकात्मतेच बीज पेरत ..दुर्गुणांचं माजलेलं तण काढत ..बंधुत्वाची मशागत करणाऱ्या या वारीला सातशे वर्षापूर्वीची परंपरा आहे .दिवसेंदिवस ही वारी हायटेक होत असली तरी भक्तीभावाचं स्वरूप मात्र तेच आहे .कोणत्याच प्रकारच्या भेदभावांना थारा न देणारी ही वारी कुतूहलाचा विषय .
शिक्षकी पेशामूळ वारीला जाता येत नसलं तरी मुलांना वारकरी बनवून पालखी सोहळ्याचा आनंद मात्र घेता येतो ..मुलांमध्ये मिसळताना त्यांच्या पालकांशी या निमित्ताने जवळ जाता येत.
चला पांडुरंगाशी असलेले आपले वैश्विक नाते अधिक समृद्ध करू या .
आमच्या संगमनेर अकोले न्यूजच्या व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद. संगमनेर अकोले न्यूज–येथे क्लिक करा.
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.