संगमनेर तालुक्यात बिबट्याचा दुचाकीवर हल्ला, महिला जखमी
संगमनेर | Sangamner news: संगमनेर तालुक्यातील वाघापूरहून संगमनेरच्या दिशेने दुचाकीवरून येत असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने दुचाकीवर अचानक हल्ला केला. यावेळी पाठीमागे बसलेली महिला जखमी झाली आहे. मंगळवारी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास वाघापूर संगमनेर रस्त्यावरील अंकुर रोपवाटिकेजवळ ही घटना घडली. दुचाकी चालकाने प्रसंगावधान राखत दुचाकी पळविल्याने मोठी दुर्घटना टळली.
मंगळवारी रात्री विनोद नामदेव बनसोडे, राहुल रंगनाथ रोहम, छाया विनोद बनसोडे हे तिघे जण दुचाकीवरून जात असताना अंकुर रोपवाटिकेजवळ अचानक बिबट्याने त्यांच्या दुचाकीवर हल्ला केला. पाठीमागे बसलेल्या छाया बनसोडे यांच्या मांडीवर पिशवी असल्याने बिबट्याचा अंदाज चुकला. मात्र त्याच्या पंजाने त्यांना मोठी दुखापत झाली. दुचाकी चालकाने प्रसंगावधान राखत दुचाकी जोरात पळविल्याने मोठी घटना टळली. तालुक्यात बिबट्यांचे माणसांवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहे. बागायती शेतात लपण्यासाठी जागा मिळत असल्याने रात्रीच्या वेळी दुचाकीस्वार यांच्यावर हल्ला होण्याचे प्रमाण वाढले आहे.
Web Title: Sangamner News Bibatya attack on bike