Home संगमनेर नाशिक पुणे हायस्पीड रेल्वेमार्ग: जमिनीचे संपादन, अधिकाऱ्यांची संगमनेरात शेतकऱ्यांसोबत बैठक

नाशिक पुणे हायस्पीड रेल्वेमार्ग: जमिनीचे संपादन, अधिकाऱ्यांची संगमनेरात शेतकऱ्यांसोबत बैठक

Sangamner Nashik Pune high Speed railway root meeting

संगमनेर: संगमनेर तालुक्यातील पठार भागातील नांदूर खंदरमाळ व खंदरमाळवाडी येथे कोरोनाच्या नियमांचे पालन करत मंगळवारी दि, १८ मे रोजी शेतकऱ्यांचीसोबत रेल्वे अधिकाऱ्यांची पहिली बैठक पार पडली. (Nashik Pune high Speed railway)

पुणे नाशिक हायस्पीड रेल्वेमार्गासाठी पुणे, नाशिक, अहमदनगर या तीन जिल्ह्यातील जमीन संपादित करण्यात येणार असल्याने जमीन संपादित करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. संगमनेर तालुक्यात पुणे नाशिक दरम्यान नवीन दुहेरी, मध्यम द्रुतगती ब्रोडगेज लाईनचे विद्युतीकरणासह बांधकामासाठी खासगी जागेचे भूसंपादन करण्यात येणार असल्याने खासगी वाटाघाटीणे तसेच थेट खरेदी पद्धतीने व्यवहार करण्यात येणार आहे. नांदूर खंदरमाळ व खंदरमाळवाडी येथील जमीन संपादित करण्यासाठी शेतकऱ्यांशी चर्चा करण्यात आल्याचे सहायक जमीन भूसंपादन अधिकारी काळे यांनी सांगितले.

सेवानिवृत्त उप जिल्हाधिकारी, महारेलचे उप-महाव्यवस्थापक सोमनाथ गुंजाळ, अभियंता निलेश खांडगे, सहायक जमीन भूसंपादन अधिकारी सचिन काळे, तलाठी बी. के. शिरोळे, सरपंच जयवंत सुपेकर, शिवाजी फणसे आदी यावेळी उपस्थित होते.

Web Title: Sangamner Nashik Pune high Speed railway root meeting

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here