नगर जिल्ह्यात करोनाबाधित रुग्णांत कुरण गाव ठरले अव्वल
संगमनेर: संगमनेर तालुक्यातील कुरण येथील करोनाबाधितांची संख्या ही सर्वाधिक आहे. आत्तापर्यंत सर्वाधिक रुग्ण आढळून आलेले कुरण गाव हे जिल्ह्यातील पहिलेच गाव आहे. २५ जून रोजी कुरणमध्ये एक ८५ वर्षीय महिला करोनाबाधित आढळून आली होती.
२५ जून ते ५ जुलै या कालवधीत सर्वाधिक ३८ रुग्ण कुरण मध्ये आढळून आले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना १९ जुलै पर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत अशी माहिती तहसीलदार अमोल निकम यांनी दिली आहे.
कुरणची लोकसंख्या ४ हजार ६३७ इतकी आहे. एकूण ६७८ कुटुंब आहेत. गावाला जोडले गेलेले सर्व बंद करण्यात आलेले आहे. संगमनेर कृषी उत्पन्न समिती मध्ये सर्वाधिक व्यापारी हे कुरणमधील आहेत. कुरणमधील ग्रामस्थांच्या आरोग्य तपासणीसाठी १४ पथके कार्यरत आहे. कुरण मधील ३१ जणांवर उपचार सुरु आहेत. एक जण जिल्हा रुग्णालयात तर ३० जण संगमनेर ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत आहेत. संगमनेर तालुक्यात सर्वाधिक १८० रुग्ण आत्तापर्यंत आढळून आले आहेत. १२ जणांचा मृत्यू झाला आहे.
वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.
Website Title: Sangamner Kuran corona highest patient in Ahmednagar