संगमनेरच्या महिलेने अश्लिल व्हिडीओ करून ब्लॅकमेल करत तरुणास 40 लाखांस लुटले- Honey Trap
शिर्डी | Shirdi: संगमनेर (Sangamner) तालुक्यातील ब्लॅकमेल (Honey Trap ) प्रकार उघडकीस आला आहे. सुकेवाडी येथील महिलने जवळे कडलग येथील एका तरुणास जाळ्यात अडकवून अश्लील क्लीप बनवून ४० लाखास गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
या महिलेच्या त्रासाला कंटाळून पीडित व्यक्तीने पोलीस ठाण्यात फिर्याद देऊन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी या महिलेला अटक करण्यात आली असून तिचा साथीदार पसार आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहेत. पीडित व्यक्ती व आरोपी संगमनेर तालुक्यातील आहेत.
संगमनेर तालुक्यातील सुकेवाडी येथील महिलेने तिच्या साथीदारासह फिर्यादीची राहाता तालुक्यातील बाभळेश्वर येथील एका हॉटेलात अश्लील व्हीडीओ क्लीप बनवली. या महिलेची व फिर्यादीची ओळख होती. त्या ओळखीने ही महिला आर्थिक परिस्थिती गरीबीची आहे, असे सांगत वेगवेगळ्या कारणांसाठी वेळोवेळी हात उसने म्हणून पैसे मागायची. असे तिने लाखो रुपये घेतले. हे पैसे परत मागूनही ते दिले नाही. अचानक 7 मार्च 2022 रोजी या महिलेने फिर्यादीला फोन करून बाभळेश्वर येथील एका हॉटेलवर बोलावले.
दुसर्या दिवशी 8 मार्च रोजी फिर्यादी हॉटेलवर गेला. रुममध्ये गेल्यावर या महिलेने पैसे मोजून घ्या, असे म्हणत दरवाजा लावून त्यानंतर काही वेळातच एक पुरूष रुममध्ये आला. त्याने या महिलेचे कपडे काढले व व्हीडीओ रेकॉर्डिंग करून माझे व या महिलेचे संबंध आहेत, असे वदवून घेतले व त्याचीही रेकॉर्डिंग केली. कुणाला काही सांगितले, तर जीवे ठार मारण्याची व व्हीडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर एमएच 17 बीव्ही 8886 या ब्रेझा गाडीत येऊन व्हीडीओ व्हायरल करण्याची धमकी देत 9 लाख रुपये उकळले.
संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग येथील व्यक्तीने शिर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार महिला व तिचा साथीदार राजेंद्र गिरी यांच्या विरोधात शिर्डी पोलिसांनी भा.दं.वि. कलम 384 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उपविभागीय अधिकारी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक योगिता कोकाटे करत आहेत.
Web Title: sangamner Honey Trap woman blackmailed a young man with a pornographic video