संगमनेर: शेतकर्याची कांदा व्यापार्याकडून फसवणूक गुन्हा दाखल
संगमनेर: शेतकर्याची कांदा व्यापार्याकडून फसवणूक गुन्हा दाखल
निमगाव जाळी: संगमनेर तालुक्यातील निमगाव जाळी येथील भीमाशंकर तळोले या शेतकर्याची श्रीरामपूर येथील कांदा व्यापारी विलास बाळासाहेब फुलारे, बापू लक्ष्मन जगदंड यांनी कांदा खरेदी करून तब्बल १ लाख ७३ हजार ९१९ रुपयांची फसवणूक केली असल्याने या दोन्ही कांदा व्यापार्यांविरोधात आश्वी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
You May Also Like: Jacqueline Fernandez bikini images and Jacqueline Fernandez sexy images
शेतकरी भीमाशंकर तळोले यांची निमगाव जाळी प्रतापपूर रस्त्यालगत शेती आहे. यामध्ये २०१७ मध्ये गावरान कांदा पिकाची लागवड करत कांद्याचे उत्पादन घेतले होते. २५ मार्च २०१८ रोजी श्रीरामपूर येथील कांदा व्यापारी विलास बाळासाहेब फुलारे व बापू लक्ष्मन जगदंड यांनी तळोले यांच्या घृ येऊन कांदा खरेदीचा व्यवहार केला व २८ व २९ मार्च रोजी अनुक्रमे ८५७१९ रुपये व ८८२०० असा एकूण १ लाख ७३ हज्जार ९१९ रुपये किमतीचा कांदा कर्नाटक येथून आणलेल्या ट्रक मधून घेऊन गेले होते.
मात्र पंधरा दिवसानंतर पैसे देण्याची वेळ आली त्यावेळेस या दोन्ही कांदा व्यापार्यांनी टाळाटाळ करत फोन बंद करून ठेवले. त्यामुळे शेतकरी भीमाशंकर तळोले व त्यांचा मुलगा श्रीरामपूर याठिकाणी तीन वेळेस जाऊनही हे कांदा व्यापारी भेटले नाहीत, त्यामुळे भीमाशंकर तळोलेयांनी त्या दोघांवर आश्वी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे.
आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा. किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.
आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजचा संपर्क करा. 9850540436
मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा