संगमनेर: चोरट्यांनी रात्रीतून फोडले आठ दुकाने
संगमनेर: चोरट्यांनी रात्रीतून फोडले आठ दुकाने
संगमनेर (प्रतिनिधी): तालुक्यातील पुणे नाशिक महामार्गावरील बोटा येथे चोरट्यांनी रात्रभर धुमाकूळ घालत आठ दुकानांचे शटर वाकवून चोरी केली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
You May Also Like: Shahid Kapoor wife age | Mira Rajput
पुणे नाशिक महामार्गावरील बोटा गावातील आठ दुकाने चोरट्यांनी फोडली. शनिवारी पहाटेच्या सुमारास हि घटना घडल्याचे समोर आले आहे. गावातील आशिर्वाद कृषी सेवा केंद्र, वर्धमान किराणा स्टोअर्स, श्रीराम कलेक्शन, नम्रता मेडिकल, श्रीराम इरिगेटर्स, सरोज गिफ्ट शॉपिं, संदीप किराणा स्टोअर्स, साईकृपा कृषीसेवा केंद्र या आठ ठिकाणी दुकानाचे शटर वाकवून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला. दुकानातील किती मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला हे अद्याप समजू शकले नाही. घटनेची माहिती समजताच घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप निघोट, पोलीस उपनिरीक्षक अन्सार इनामदार यांनी घटनास्थळी भेट दिली असून पुढील तपास सुरु केला आहे.
याअगोदर हि बोटा परिसरात चोऱ्या झाल्या परंतु पोलिसांना शोध लावण्यास अपयश आले होते.
आमच्या संगमनेर अकोले न्यूजच्या व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद. संगमनेर अकोले न्यूज–येथे क्लिक करा.
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.