संगमनेर: जोर्वेत तिघांना मारहाण, आम्ही येथून वाळू वाहणारच, तुम्हाला….
Breaking News | Sangamner Crime: आम्ही येथून वाळू वाहणारच, तुम्हाला काय करायचे ते करा. धक्काबुक्की करून लोखंडी गजाने मारहाण.
संगमनेर: दुचाकीचा धक्का लागल्यानंतर तुम्ही येथून वाळूची वाहतूक का करता असे विचारले असता उलट महिलेलाच शिवीगाळ केली. त्यावर महिलेचा मुलगा शिवीगाळ का करता म्हणून विचारण्यास गेला असता त्यालाही धक्काबुक्की करून लोखंडी गजाने मारहाण केली. वडीलही मध्ये आले असता त्यांनाही शिवीगाळ व दमदाटी करून मारहाण केल्याची घटना जोर्वे (ता. संगमनेर) येथे नुकतीच घडली आहे. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलिसांत सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत तालुका पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, की ध्रुव दिगंबर काकड याची आई गोठ्यासमोर झाडत होती. तेव्हा तेथून बाळासाहेब कारभारी दिघे हा त्याच्या मोटारसायकलवरुन जात असताना आईला धक्का लागला. तेव्हा आईने त्यास विचारले, तुम्ही येथून वाळूची वाहतूक का करता? आता मला काही झाले असते तर तुम्ही काय केले असते. यावर दिघे याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली असता ध्रुव काकड तेथे गेला आणि शिवीगाळ का करता अशी विचारणा केली असता दिघे याने धक्काबुक्की करून लोखंडी गजाने मारहाण केली. तेव्हा आई सोडवण्यासाठी मध्ये आली असता तिलाही धक्काबुक्की केली. याचवेळी प्रमोद संजय दिघे, पवन संजय दिघे, अक्षय नानासाहेब दिघे, एक अल्पवयीन मुलगा, नानासाहेब कारभारी
दिघे यांनी आई व मुलाला शिवीगाळ करून मारहाण केली. आम्ही येथून वाळू वाहणारच, तुम्हाला काय करायचे ते करा. तुम्ही जर आमच्यावर केस केली तर तुमचे तुकडे करू अशी धमकी दिली. यावेळी वडील दिगंबर भाऊसाहेब काकड हे वाद सोडविण्यासाठी आले असता त्यांनाही शिवीगाळ व दमदाटी करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यात आईची पोत तुटून एक मोबाईल गहाळ झाला आहे. याप्रकरणी ध्रुव काकड याने दिलेल्या फिर्यादीवरून वरील सहा जणांवर गुरनं. १७२/२०२४ भादंवि कलम ३२४, ३२३, ४२७, १४३, १४७, १४८ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस करत आहेत.
Web Title: Sangamner Crime We will blow the sand from here, you
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study