Home क्राईम संगमनेर: प्राध्यापक पती-शिक्षिका पत्नीची तब्बल ४५ लाख २३ हजार ५१२ रुपयांची फसवणूक

संगमनेर: प्राध्यापक पती-शिक्षिका पत्नीची तब्बल ४५ लाख २३ हजार ५१२ रुपयांची फसवणूक

Ahmednagar Sangamner Crime News:  विविध कंपन्यांमध्ये पैसे गुंतवण्यास भाग पाडून प्राध्यापक पती-शिक्षिका पत्नीची तब्बल ४५ लाख २३ हजार ५१२ रुपयांची फसवणूक.

Sangamner Crime Professor husband-teacher wife fraud of Rs. 45 lakh 23 thousand 512

संगमनेर: चांगला परतावा मिळेल व पैसे कमी वेळेत दुप्पट होतील असे खोटे आश्वासन देऊन विविध कंपन्यांमध्ये पैसे गुंतवण्यास भाग पाडून प्राध्यापक पती-शिक्षिका पत्नीची तब्बल ४५ लाख २३ हजार ५१२ रुपयांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे

संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी परिसरात राहणाऱ्या सौ. सुरेखा प्रमोद खैरे व त्यांच्या पतींची फसवणूक झाल्याचे समोर आली आहे.  डिसेंबर २०१७ पासून ते ऑगस्ट २०२२ दरम्यान गणेश राधाकिसन वर्पे, सौ. मंगल गणेश वर्पे, रेश्मा आबासाहेब देसाई, महेश विजय मांढरे यांनी खैरे पती-पत्नीची फसवणूक केली. २०१७ मध्ये खैरे कुटुंबियांच्या घरी आर. ओ. प्युरीफायर बसवण्याचे संपर्कातून गणेश राधाकिसन वर्षे, रा. वरवंडी , ता. संगमनेर याच्या सोबत ओळख झाली होती. त्यावेळी गणेश वर्पे याने मी बिग लाईफ केअर या आर ओ. कंपनीत झोनल मॅनेजर म्हणून काम करतो असे सांगितले होते. गणेश व त्याची पत्नी मंगल वर्पे असे दोघांचे खैरे यांच्या घरी येणे जाणे वाढले. मी एफएमएलसी ग्लोबल मार्केटींग हरियाना, दास कॉईन, (नेट लिडर) संकल्प सिद्धी प्रोडक्ट प्रायव्हेट लिमीटेड नाशिक, आर. आर. वर्ल्ड फायनान्स कंपनी मुंबई अशा विविध मार्केटींग कंपन्यांमध्ये हिस्सेदार म्हणून काम करत असल्याचे गणेश याने सांगितले. वरील कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून बंगला, महागड्या गाड्या, पुण्या सारख्या ठिकाणी लोढा कॉम्प्लेक्समध्ये फ्लॅट अशी मालमत्ता कमविली आहे.

तसेच कंपन्यांद्वारे येणार रिर्टन्स बँकेचे स्टेटमेंट दाखवून त्याने व त्याची पत्नी मंगल हिने आम्हाला तुम्ही पण या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून कमी काळात दुपटीने पैसे कमवून देतो अशी हमी देऊन खैरे कुटुंबीयांचा विश्वास संपादन केला. गणेश वर्पे याने रेश्मा देसाई हिच्या सोबत खैरे कुटुंबियाची ओळख करून दिली. रेश्मा ही माझी बिजनेस पार्टनर असून तिला पण या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा झालेला आहे असे वर्पे याने सांगितले. रेश्मा देसाई हिने कंपन्याबाबत माहिती देऊन तुम्हाला कमी वेळेत दुपटीने पैसे मिळतील अशी हमी दिली यामुळे खैरे दाम्पत्याचा तिच्या बोलण्यावर विश्वास बसला. त्याच प्रमाणे महेश मांढरे हा गणेश वर्षेच्या मामाचा मुलगा जो त्यांचा बिजनेस मॅनेजर म्हणून काम करतो व महेश मांढरे हा गणेश वर्पे यांच्या सोबत मार्केटींगही करतो असे म्हणून त्याचीही ओळख करून दिली होती.

डिसेंबर २०१७ मध्ये गणेश वर्पे व मंगल वर्पे यांच्यावर विश्वास ठेवून सौ. खरे यांनी ७ लाख ५० हजार रुपयांची गुंतवणूक एफएमएलसी ग्लोबल लाईफ केअर कंपनी हरियाणा या कंपनीत गणेश वर्षे याच्या मार्फतीने गुंतवणूक केली. यानंतर सौ. खैरे यांच्या नावाचा आय डी तयार केला व त्यातून त्यांच्या बँक खात्यावर महिन्याला रिटर्नस येवू लागले. त्यामुळे खैरे यांचा ग्लोबल लाईफ केअर कंपनी, गणेश वर्पे, मंगल वर्पे, रेश्मा देसाई व महेश मांढरे यांच्यावर विश्वास वाढला. काही दिवसांनी गणेश वर्पे, रेश्मा देसाई, महेश मांढरे व मंगल वर्पे यांनी खैरे कुटुंबीयांची भेट घेऊन तुम्ही दास क्वाईन क्रीप्टो करन्सी मध्ये पैसे गुंतवल्यास तुम्हाला एका वर्षात दुप्पट पैसे करून देतो. असे त्यांनी आम्हाला लॅपटा प्रेझेंटेशन देवून पटवून देवून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यामुळे खैरे यांनी दि. २ जानेवारी २०२० रोजी प्रमोद खैरे यांच्या महाराष्ट्र बँकेच्या खात्यावरून गणेश वर्पे यांच्या बँक खात्यावर ५ लाख ५० हजार रुपये ट्रान्सफर केले. त्यानंतर गणेश वर्पे याचे मालकीची आदीराज एंटरप्रायजेस या खात्यावर दि. १४ मार्च २०१८ रोजी खैरे यांच्या एचडीएफसी बँक खात्यामधून २ लाख ३० हजार रुपयांची रक्कम ट्रान्सफार केली.

तसेच दि. १४ मार्च २०१८ रोजी दहा लाख रुपयांची रक्कम खैरे यांनी आदीराज एंटरप्रायजेस मालदाडरोड येथिल ऑफीसात गणेश वर्पे, रेश्मा देसाई व महेश मांढरे यांना मिळून दिली होती. सर्व रकमेतून दास क्वाईन क्रीप्टो करन्सी या क्रीप्टो करन्सी मधून एक्झीक्युटीव्ह लाससन्स व प्रेसिडेंट लायसन्स खरेदी केलेले आहे असे वर्पे याने खैरे यांना सांगितले. त्यानंतर गणेश वर्षे याने ६ महिन्यांनी एक लाख रुपये रोख स्वरूपात दिले व पुढील ६ महिन्यात क्वाईनची किंमत वाढली की सर्व रक्कम दुप्पट स्वरूपात देतो असे सांगून खैरे यांना पैशांची हमी घेतली होती. गणेश वर्पे याने मी संकल्प सिद्धी प्रोडक्ट प्रायव्हेट लिमीटेड नाशिक या कंपनीत पार्टनर असून तुम्हाला या कंपनीतही चांगला फायदा करून देतो असे सांगतिले म्हणून आम्ही गणेश वर्षे संकल्प सिद्धीच्या बँक खात्यावर दि. १७ जानेवारी २०१९ रोजी ७ लाख ७४ हजार रुपयांची रक्कम ट्रान्सफर केली.

गणेश वर्पेचा सहभाग असलेली आर. आर. वर्ल्ड फायनान्स सव्हींसेस कंपनी मुंबई याचे बँक खात्यावर दि. ७ मार्च २०२० रोजी १४ लाख रुपये खैरे यांच्या कोटक महिंद्रा बँकेच्या खात्यावरून ट्रान्सफर केली. सदरच्या दोन्ही कंपन्या शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करित असतात दि. २८ सप्टेंबर २०२० रोजी गणेश वर्पे याचे कोटक महिंद्रा बँक खात्यावर माझा कोटक महिंद्रा बँक खात्यावरून ४ लाख रुपये आणि दि. ३० सप्टेंबर २०२० रोजी गणेश वर्पे याचे आयसीआयसी बँक खात्यावर ३ लाख रुपये प्रमोद खैरे यांच्या एच डीएफसी बँक खात्यावरून रक्कम ट्रान्सफर केली आहे. त्यानंतर २४ जून २०२० रोजी मंगल वर्पे हिचे खात्यावर ४ लाख रुपये आर. आर. वर्ल्ड कंपनीत पेमेंटची डीलीव्हरी करण्यासाठी व इतर मार्केटींग मधिल अडचणीसाठी दिले होते. सौ. खैरे या आपल्या सासरी बुरुडगाव रोड अहमदनगर येथे असताना गणेश वर्पे, रेश्मा देसाई, महेश मांढरे हे २ ऑगस्ट २०२० अहमदनगर येथे गेले होते. त्यावेळी पुन्हा १५ लाख रुपये आर. आर. वर्ल्ड कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी देण्यात आले. त्यावेळी सदरची रक्कम योग्य परताव्यासह परत करण्याची हमी त्यांनी घेऊन सदर कंपनीचे प्रोमीसरी नोट व चेक दिले होते.

दि. २६ ऑक्टोबर २०२१ रोजी रेश्मा देसाई यांच्या बँक खात्यामधून ३ लाख रुपये प्रमोद खैरे यांच्या बँक खात्यावर आले. दि. २१ नोव्हेंबर २०२१ रोजी गणेश वर्पे यांचे बँक खात्यावरून १ लाख ५० हजार रुपयांची रक्कम प्रमोद खैरे यांच्या खात्यावर आली अशी एकूण ४ लाख ५० हजार रुपयांची रक्कम प्रमोद खैरे यांच्या खात्यावर आली परंतु कंपन्यामध्ये गुंतवलेल्या पैश्यांमधून परतावा मिळत नव्हता त्यामुळे खैरे दाम्पत्याने गणेश वर्पे, मंगल वर्पे, रेश्मा देसाई, महेश मांढरे यांना वारंवार पैशाबाबत विचारणा केली. त्यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही व तुम्हाला तुमचे पैसे लवकर मिळतील असे खोटे आश्वासन दिले. सौ. सुरेखा खैरे यांनी याबाबत शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी चौघांच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर १७२ /२०२३ भारतीय दंड संहिता कलम ४२०, ४०६, ३४ प्रमाणे दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सातपुते हे करत आहे.

Web Title: Sangamner Crime Professor husband-teacher wife fraud of Rs. 45 lakh 23 thousand 512

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here