संगमनेर शहरात पैसे देण्यास नकार दिल्याने एकास मारहाण
Breaking News | Sangamner Crime: अनोळखी व्यक्तीने पैसे मागितल्यानंतर ते देण्यास नकार दिल्याने ३७ वर्षीय तरुणाला मारहाण केल्याची घटना.
संगमनेर : अनोळखी व्यक्तीने पैसे मागितल्यानंतर ते देण्यास नकार दिल्याने ३७ वर्षीय तरुणाला मारहाण केल्याची घटना शुक्रवारी (दि. १९) दुपारी दोन वाजेच्या सुमारास नवीन नगर रस्त्यावर घडली.
याप्रकरणी मारहाण करणाऱ्या अज्ञाताविरोधात संगमनेर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत किरण सोमनाथ एरंडे (वय ३७, रा. झोळे, ता. संगमनेर) असे मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. अनोळखी व्यक्तीने पैसे मागितले होते. पैसे देण्यास नकार दिल्याने त्याने मारहाण करून जखमी केले, असे फिर्यादीत म्हटले आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला.
Web Title: Sangamner Crime One was beaten for refusing to pay
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study