संगमनेर: लग्नास नकार तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न, प्रियकरावर बलात्काराचा गुन्हा
संगमनेर | Sangamner: लग्नास नकार दिल्याने शहरातील एका १८ वर्षीय युवतीने शुक्रवारी घरी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ती बचावली आहे. रविवारी ती शुद्धीवर आली. तिने दिलेल्या जबाबावरून पोलिसांनी अरबाज पठाण रा, अकोले नाका याच्यावर बलात्काराचा (rape) गुन्हा दाखल केला असून शहर पोलिसांनी त्यास अटक केली आहे.
अकोले नाका परिसरात राहणाऱ्या अरबाज पठाण याने शहरातील मुलीस आपल्या प्रेमाच्या ओढले. तिला लग्नाची लालसा दाखवत तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध ठेवले. जेव्हा तिने त्याला लग्नांबद्दल विचारले तेव्हा त्याने वेळ मारून नेली. पठाणने गोड बोलून आश्वासन देत तीन वर्ष तिच्याबरोबर शारीरिक संबंध ठेवले. तदनंतर लग्नास विचारांना केली असता आंतरजातीय विवाहासाठी घरातील लोक तयार होत नाही असे कारण सांगून लग्नास नकार दिला. याच धक्क्याने तरुणीने विषारी औषध प्राशन केले. तिच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते.
ती रविवारी शुद्धीवर आल्याने पोलिसांनी जबाब नोंदवून पुढील कार्यवाही करण्यात आली आहे. पठाण यास पोलिसांनी अटक केली आहे.
Web Title: Sangamner Crime of rape on boyfriend