संगमनेर: गौण खनिजाचे अवैधरित्या वाहतूक; वाहन पळविले
Sangamner Crime: दगडांची अवैधरीत्या वाहतूक, दोघांवर गुन्हा दाखल.
संगमनेर: दगडांची अवैधरीत्या वाहतूक होत असलेले वाहन तलाठी आणि कोतवाल यांनी थांबवत चालकाला ते वाहन घेऊन तहसील कार्यालयात लावण्यास सांगितले. मात्र, चालकाने वाहन घेऊन पळ काढला. हा प्रकार शुक्रवारी (दि.०६) सकाळी साडेअकराच्या सुमारास कोळवाडे- संगमनेर रस्त्यावर घडला. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाहन चालक (नाव पत्ता माहीत नाही) व मालक अण्णासाहेब कुसळकर (रा. निमज) याच्या विरुद्ध तालुक्यातील पिंपरणे येथील तलाठी संग्राम बाळासाहेब देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती देताना तलाठी देशमुख यांनी सांगितले की, तालुक्यात गौण खनिजाची अवैधरीत्या वाहतूक होत असताना तहसीलदार अमोल निकम असता यांनी कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
शुक्रवारी पिंपरणे येथे सजा पीक पाहणीचे काम सुरू होते. यावेळी कोळवाडे येथून संगमनेरकडे जाणारे वाहन टाटा टेम्पो (एम.एच.२०, बी.टी.३८७६) मध्ये दगड भरून जात असताना आढळून आला. सदर टेम्पो चालकास थांबण्याचा इशारा केला असता त्याने तो थांबविला. त्यात दगड गौण खनिज भरलेले दिसले. चालकाला नाव, पत्ता विचारला असता त्याने नाव सांगण्यास नकार दिला. कोणाची गाडी आहे, याबाबत विचारले असता चालकाने अण्णासाहेब कुसळकर (रा. निमज) यांची आहे, असे सांगितले. गौण खनिज भरण्याचा व वाहतुकीचा परवाना आहे का, याबाबत विचारले त्याने नाही म्हणून सांगितले.
Business Idea | तुम्हाला तुमचा स्वतः चा बिजनेस सुरु करायचा मग हा व्हिडियो जरूर पहा
त्यामुळे सदर टेम्पो तहसील कार्यालयात लावण्यास सांगितले. टेम्पो तहसील कार्यालयात लावण्यास येत असताना चालकाने टेम्पो भरधाव नेला.
Web Title: Sangamner Crime Illegal transportation of minor mineral The vehicle ran away
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App