संगमनेर तालुक्यात चिंचपूर येथे सराफ दुकानावर दरोड्याच्या तयारीतील टोळीला अटक
संगमनेर(Sangamner): संगमनेर तालुक्यातील चिंचपूर परिसरात सराफ दुकानावर दरोड्याच्या तयारीत असलेल्या दरोडेखोर टोळीचा पर्दाफाश करत दहा आरोपींना पोलिसांनी पकडले आहे. दोन दरोडेखोर पसार झाले आहेत. त्यांच्याकडून दोन ट्रक, एक पिकअप घातक शस्रे असा सुमारे २३ लाख रुपयांचा मुद्देमाल आश्वी पोलिसांनी हस्तगत केला आहे.
पोलीस उपनिरीक्षक नयन पाटील, पोलीस नाईक शांताराम झोडगे, आनंद वाघ, अमोल सहाणे, माजी सैनिक दामोधर भोसले हे शनिवारी तरी गस्त घालत असताना लोणी संगमनेर रस्त्यावर चिंचपूर शिवारात वृंदावन हॉटेलसमोर उभ्या असलेल्या माल वाहतूक ट्रक व पीक अप वाहनांमध्ये संशयास्पद हालचाली आढळून आल्या पोलीस दिसताच दरोडेखोर पळून जात होते. मात्र पोलिसांनी चपळाई करत झडप टाकत अरुण काळे, समाधान घुमरे रा. उस्मानाबाद यांना पकडले.
यासंदर्भात अधिक माहिती पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर यांना दिली असता दिली असता त्यांनी चिंचपूर येथील पळून गेलेल्या आठ दरोडेखोरांना अटक केली. पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता त्यांनी परिसरातील सराफ दुकानावर दरोडा टाकणार असल्याचे सांगितले. त्यांच्याकडे मालवाहतूक ट्रक, पिकअप, कटर तार, गज, पहार कत्ती व इतर हत्यारे होती ती हस्तगत करण्यात आली आहे.
वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.
Website Title: Sangamner Chinchpur Gang arrested for preparing robbery