संगमनेर: कारचा टायर फुटून अपघात- Accident
Sangamner | संगमनेर: कारचा टायर फुटुन कार महामार्गाच्या संरक्षक कठड्यावर आदळून अपघात (Accident) झाल्याची घटना पुणे – नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील तालुक्याच्या पठार भागातील घारगांव येथील हॉटेल दौलत जवळ शनिवार दिनांक ४ जुन रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात एक जण जखमी झाले आहे. सुदैवाने इतर बालंबाल बचावले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, अशपाक मनियार, सिकंदर मनियार, सलमान मनियार, सायरा मनियार, आरीफा मनियार, हलीमा मनियार हे कार (क्रमांक एम एच १४ जी ए ५८८९) हिच्यातून राजगुरुनगर येथून संगमनेर येथे कार्यक्रमासाठी चालले होते. शनिवारी दुपारी एक वाजेच्या दरम्यान घारगांव परीसरातील हॉटेल दौलत जवळ आले असता कारचा पुढील बाजूचा टायर फुटला. त्यानंतर कार महामार्गाच्या संरक्षक कठड्यावर जाऊन आदळली. या अपघातात हलीमा मनियार ह्या जखमी झाल्या आहेत. केवळ दैव बलवत्तर म्हणून बाकीचे सर्व प्रवासी बालंबाल बचावले.
Web Title: Sangamner Car tire rupture accident