संगमनेर: घारगाव हद्दीत मुळा नदीपात्रात तरंगताना आढळला मृतदेह
संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यातील घारगाव हद्दीत मुळा नदीपात्रात एका ४० वर्षीय पुरुषाचा मृतदेह तरंगत असताना आढळून आला. बुधवारी सकाळी १२ वाजेच्या दरम्यान ही घटना उघडकीस आली.
शांताराम तात्याराव शिंदे वय ४० रा. खंदरमाळ असे या मयत व्यक्तीचे नाव आहे. सोमवारी शांताराम शिंदे हे खंदरमाळ येथील राहत्या घरातून कामानिमित्त बाहेर पडले होते. मात्र ते घरी न आल्याने त्यांची पत्नी कल्पना व मुलगा दिलीप वय १५ हे त्यांचा शोध घेत होते. नाशिक पुणे महामार्गावर घारगाव येथील पुलावरून काही नागरिकांना बुधवारी सकाळी नदीत मृतदेह नदीत तरंगताना आढळला. हा प्रकार घारगाव पोलिसांना सांगण्यात आला. या घटनेची माहिती पोलिसांना समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह बाहेर काढला. हा मृतदेह शावविचेदन करण्यासाठी कुटीर रुग्णालयात नेण्यात आला. या व्यक्तीचे मृत्यू मागचे कारण अद्याप समजू शकले नाही.
Web Title: Sangamner body was found floating in a river