Sangamner Taluka: वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू
संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यातील निमज गावाच्या शिवारात रविवारी पहाटे रस्ता ओलांडत असताना बिबट्याला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने बिबट्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
हा बिबट्या नर जातीचा आहे. त्याचे वय साधारणपणे दीड वर्षाचे असल्याचे वनरक्षक सी. डी. कासार यांनी सांगितले. अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबट्याचा मृत्यू झाल्याची माहिती संगमनेर वन विभागाचे वनरक्षक सी. डी. कासार यांनी दिली. निमज गावच्या शिवारात खंडोबा मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर अज्ञात वाहनाने बिबट्याला धडक दिली. यात त्याच्या तोंडाला जबर मार लागला. या घटनेची माहिती समजताच वनपाल, वनकर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. या घटनेचा पंचनामा केला असून बिबट्याचा मृतदेह उत्तरणीय तपासणीसाठी ताब्यात घेत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
Web Title: Sangamner Bibatya killed in a vehicle crash