संगमनेर तालुक्यात बिबट्याचा शेतकऱ्यावर हल्ला
संगमनेर | Accident: संगमनेर तालूक्यातील शेळकेवाडी येथील शेतकरी राजेंद्र ज्ञानदेव वाघ हे दुचाकीवरून घरी परतत असताना अचानक बिबट्याने हल्ला केल्याने दुचाकीहून पडलेल्या राजेंद्र वाघ यांना दुखापत झाली. रविवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे.
राजेंद्र वाघ हे रविवारी दुपारी घारगाव येथे कामानिमित्त गेले होते. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास शेळकेवाडी ते वाघवाडा रस्त्याने दुचाकीहून घरी परतत असताना रस्त्यालगत उसाच्या शेतात्त दबा धरून बसलेल्या बिबट्याने वाघ यांच्यावर हल्ला केला. सुदैवाने यावेळी बिबट्याचा हल्ला फसला मात्र वाघ हे दुचाकीहून खाली पडले. त्यांनी आरडाओरडा केल्याने व गाडीच्या आवाजाने बिबट्याने धूम ठोकली. दुचाकीहून पडल्याने त्यांना दुखापत झाली असून रुग्णालयात उपचार घेत आहे.
Web Title: Sangamner Bibatya Attack and Accident