भोंदु बाबाने स्वामी समर्थांच्या नावाखाली एका कुटुंबाला ५० हजारांचा गंडा
भोंदु बाबाने स्वामी समर्थांच्या नावाखाली एका कुटुंबाला ५० हजारांचा गंडा
संगमनेर : – समाजातील अंधश्रद्धा धूर व्हावी, समाज शिक्षित व्हावी यासाठी संतांनी त्याचबरोबर अनेक राष्ट्रपुरुषांनी या समाजासाठी आपले जीवन समर्पित केले आहे. मात्र २१ व्या शतकात ही अनेकजण जात धर्मासाठी भोंदुबाबांना बळी पडतात व स्वत:ची फसवणुक करुन घेतात. अकोले तालुक्यातील बोरी येथेही अशा प्रकारे एका भोंदु बाबाने स्वामी समर्थांच्या नावाखाली पैसे डबल करुन देतो म्हणुन एका कुटुंबाला ५० हजारांचा गंडा घातला.
You May Also Like: Suhana Khan age, Birthdate, Biography, height
अकोले तालुक्यातील बोरी येथील एका शेतकऱ्यांकडे भगवे वस्त्र घालुन स्वामी समर्थांचे नाव घेत तीन साधु आले होते. स्वामींसाठी दान, धर्म करा असे म्हणत त्यांनी भिक्षा मागितली. सदर कुटुंब हे स्वामींचेच भक्त होते. त्यांनीही मोठया मनाने या साधुंना दोन हजारांचे दान दिले. भक्त जाळयात अडकल्याचे पहाताच या साधुंनी त्यांना मोहिनी घालत आम्ही मंत्राच्या आधारे पैसे डबलही करुन देतो असे सांगत त्यांचा विश्वास संपादन केला. मात्र त्यानंतर या साधुवंर विश्वास ठेवत व पैसे डबल होतील म्हणुन घरात भिशीचे ठेवलेले ५० हजार रुपये त्यांनी साधुंच्या ताब्यात दिले. त्यानंतर साधुंना लालच सुटल्याने या साधुंनी या पैशावर हळद कुंकु वाहुन त्यावर भगवे वस्त्र ठेवुन पुजा, मंत्र, जप सुरु केला. व त्या कुटंबाला पुजेत गुंतवुण ठेवले. आम्ही सांगेल तेंव्हाच डोळे उघडायचे असे सांगत जप सुरु ठेवण्याचे सांगितले. तो पर्यंत या तिन्ही साधुंनी हे पैसे घेऊन तेथुन पळ काढला. काही वेळानंतर या कुटुंबाचे डोळे उघडल्यांनंतर या कुटुंबाला आपण लुटलो गेलो असल्याची जाणीव झाली. मात्र तो पर्यंत हे तीनही भामटे तेथुन पसार झाले.
मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा
आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.
