संगमनेर : भोजपुर धरणांची उंची वाढविण्याबाबत फेरसर्व्ह होणार
संगमनेर : भोजपुर धरणांची उंची वाढविण्याबाबत फेरसर्व्ह होणार
संगमनेर : – गेले अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या भोजपुर धरणाची उंची वाढविण्याच्या मागणीकडे विरोधी पक्षनेते ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन यांचे लक्ष वेधले असुन, भोजपुर धरणाची उंची वाढविण्याच्या संदर्भात सर्वेक्षण आणि धरणाच्या लाभक्षेत्रातील घटकांची मत जाणुन घेवुन तातडीने अहवाल सादरा करा अशी सुचना जलसंपदा मंत्र्यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
You May Also Like: Deepika Padukone Ranveer Singh Marriage Date
तालुक्यातील भोजपुर धरणाची उंची ३ मीटरने वाढवावी अशी मागणी गेली अनेक वर्षे प्रलंबित आहे. या मागणीसाठी लाभक्षेत्रातील शेतकाऱ्यानी आंदोलनेही केली आहेत. शासनाच्या विविध स्तरावर शेतकऱ्यांनी या मागणीचा पाठपुरावा संरु ठेवला असला तरी, ठोस निर्णय झालेला नाही. या भागातील शेतकऱ्यानी आणि संघर्ष समितीचे निमंत्रक इंजिनिअर हरीश चकोर, किसन चत्तर व निमोणचे सरपंच संदीप देशमुख यांनी विरोधी पक्षनेते ना. विखे पाटील यांची भेट घेवुन भोजपुर धरणाच्या आणि कालव्यांचा प्रश्नाबाबत आपण व्यक्तीश: लक्ष घालावे अशी विनंती केली होती. बुधवारी मुंबई येथे जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन यांच्या दालणात जलसंपदा विभांगाच्या विविध प्रश्नांबाबत महत्त्वपुर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत विरोधी पक्षनेते ना.विखे पाटील यांनी भोजापुर धरणाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत सविस्तर निवेदन मंत्र्यांना सादर केली. बैठकीस जलसंपदा विभागाचे सचिव पानसे, गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक कोईनकर, सहसचिव नागेश शिंदे, नाशिक मंडळाचे मुख्य अभियंता के.बी.कुलकर्णी अधिक्षक अभियंता राजेश मोरे , अभियंता श्रीमती अहिरराव, कार्यकारी अभियंता श्रीमती संगिता जगताप , अभियंता बागुल आदि याप्रसंगी उपस्थित होते.
या बैठकीत भोजापुर धरणाच्या प्रलंबित असलेल्या कामाबरोबरच या धरणाच्या पुरचारीचे कामे मंद गतीने गेली अनेक वर्ष आहे आहे. या कामांची तातडीने चौकशी करावी आणि ही कामे जलसंपदा विभागानेच करावीत अशी मागणी विरोधी पक्षनेते ना. विखे पाटील यांनी प्राधान्यांने केली. भोजपुर धरणाच्या संदर्भात असलेल्या प्रश्नांचे गांभिर्य आपल्याला निश्चित असुन या प्रश्नाबाबत स्थानिक पातळीवर मतमतांत्तरे असतील, धरणाची उंची वाढविल्यास बंडीत क्षेत्र किती असेल, या बाबत फेरसर्वेक्षण करुन आणि या भागातील घटकांची मत जाणुन घेवुन लवकरात लवकर अहवाल सादर करा अशा सुचना मंत्री ना. गिरीष महाजन यांनी सादर केली.
मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा
आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.