Accident: संगमनेर: वडगाव फाटा येथे दोन दुचाकींत धडक होत अपघात एक ठार
Sangamner | संगमनेर: संगमनेर तालुक्यातील वडगाव पान फाटा येथे दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन अपघात (Accident) झाला. या अपघातात एक जण जागीच ठार झाला. शिराज उद्धीन खान वय ३७ रा. निमगाव पागा ता. संगमनेर असे मयत व्यक्तीचे नाव आहे.
शिराज खान हा करुले येथे मामाकडे दुचाकीहून जात होता. रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास वडगाव पान फाटा येथे जात असताना समोरून येणाऱ्या दुचाकीने त्याच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत शिराज खान हा गंभीर जखमी झाला. व जागीच ठार झाला. अपघातास कारणीभूत दुचाकीस्वार दुचाकी त्या ठिकाणी सोडून पसार झाला. याप्रकरणी मदर अली खान रा. करुले यांनी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अपघातास कारणीभूत दुचाकी चालकाविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शिंदे अधिक तपास करीत आहे.
Web Title: Sangamner Accident One killed in two-wheeler collision at Wadgaon Fata