संगमनेरात धूमस्टाईलने शिक्षिकेचे मिनी गंठण लांबविले
Breaking News | Sangamner Crime: सं गमनेरात दोघांविरुद्ध गुन्हा, दोघा अज्ञात चोरट्यांनी रस्त्यावरून पायी जाणाऱ्या एका शिक्षिकेचे ५० हजार रुपयांचे दागिने लांबविले.
संगमनेर : दुचाकीवरून आलेल्या दोघा अज्ञात चोरट्यांनी रस्त्यावरून पायी जाणाऱ्या एका शिक्षिकेचे ५० हजार रुपयांचे दागिने लांबविले आहे. शहरालगतच्या गुंजाळवाडी परिसरात शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, वृत्तपत्र विक्रेते दिनेश टकले यांच्या भावजयी शिक्षिका योगिता निखिल टकले (वय ३९) या संगमनेर शहरालगतच्या गुंजाळ मळा परिसरातील श्रद्धा कॉलनी मध्ये राहतात. शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास त्या वॉकिंग करून घरी पाई जात होत्या. शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोघा अज्ञात चोरट्यांनी टकले यांचे पन्नास हजार रुपये किंमतीचे १५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठण लांबविले. दुचाकीवर मागे बसलेल्या चोरट्याने टकले यांचे गंठण ओढले. यानंतर चोरटे फरार झाले.
याबाबत योगिता टकले यांनी येथील शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी दुचाकीवरील दोन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करीत आहे.
Web Title: Sangamaner, Dhoomstyle extended the teacher’s mini ganth
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News