Home अहमदनगर अहिल्यानगर: लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नववधूने धूम ठोकली

अहिल्यानगर: लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नववधूने धूम ठोकली

Breaking News | Ahilyanagar Crime: लग्नाच्या नावाखाली विवाहोत्सुक, लग्नाळू तरूणांना फसवून त्यांचे पैसे लुबाडणारी टोळी अहिल्यानगर जिल्हात सक्रिय.

On the second day of the wedding, the bride made a splash

जामखेड : लग्न कराव, सेटल व्हावं अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. काहीजण प्रेमविवाह करतात, पण काही लोक अरेंज मॅरेजचा मार्ग निवडतात, त्यासाठी विवाह मंडळात नावही नोंदवलं जातं. मात्र लग्नाच्या नावाखाली विवाहोत्सुक, लग्नाळू तरूणांना फसवून त्यांचे पैसे लुबाडणारी टोळी अहिल्यानगर जिल्हात सक्रिय झाली आहे. पोलिसांनी आतापर्यंत अनेक टोळ्यांचा पर्दाफाश केला आहे. मात्र तरी सुद्धा अनेक लग्नाळू तरुण अश्या फसवणूक करणाऱ्या टोळ्यांना बळी पडत आहे.

अशीच एक घटना अहिल्यानगर जिल्हातील जामखेड तालुक्यातील खर्डा येथे घडली असून तेथे एका तरूणाची फसवणूक करण्यात आली आहे. त्याला तब्बल ५ लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, बाबू गोरख मत्रे ( वय २८ वर्ष) असे फसवणूक झालेल्या तरूणाचे नाव असून लग्न करून देण्यासाठी त्याच्याकडून तब्बल ५ लाख रुपये उकळण्यात आले. बाबूच्या ओळखीचे लग्न लावून देणारे एजंट बापू काटे आणि नाना कात्रजकर या दोघांनीच त्याची फसवणूक केली. १५ जून २०२४ रोजी बाबू मत्रे या तरुणाचे एका मुलीसोबत लग्न लावून दिले. मात्र लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी मुलीने नवरदेवाच्या घरून धूम ठोकली.

जामखेड तालुक्यातील बाबू मत्रे हा लग्नासाठी अनेक दिवसांपासून मुलीच्या शोधात होता अशातच त्याला त्याच्या ओळखीचे लग्न लावून देणारे एजंट बापू काटे आणि नाना कात्रजकर हे भेटले. त्यावेळी त्यांनी लग्नासाठी पाच लाख रुपये लागतील असे सांगण्यात आले. मत्रे याच्याकडून सर्व तयारी करण्यात आली. पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे दोघांचेही लग्न लावून देण्यात आले. मात्र लग्नाच्या दुसऱ्या दिवशी नवरी मुलीने धूम ठोकली. लग्न आणि भावी आयुष्याची स्वप्न पाहणाऱ्या बाबूने आपले लग्न लावून देण्यासाठी एजंट आणि मुलीकडच्या फसवणाऱ्या टोळीला एकूण ३ लाख ६० हजार रुपये तसेच दोन तोळे सोने दिले होते. मात्र लग्नाच्या दुसऱ्या दिवशी नवरी मुलगी फरार झाली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर बाबूने खर्डा पोलीस ठाण्यात नवरी मुलगी आणि तिच्यासोबत आलेल्या टोळीविरोधात फिर्याद नोंदवली. त्या आधारे खर्डा पोलिस स्टेशमध्ये दोन एजंट, मुली सोबत आलेली एक करवली आणि लग्न जमवून देणारी महिला अशा ५ जणांविरोधात खर्डा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड हे करत आहेत.

Web Title: On the second day of the wedding, the bride made a splash

See also: Latest Marathi News,  Breaking News liveSangamner NewsAhmednagar News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here