Home क्राईम संगमनेर: अवैध देशी दारू विक्री; दोघांवर गुन्हा

संगमनेर: अवैध देशी दारू विक्री; दोघांवर गुन्हा

Sangamner Crime: पोलिसांचा छापा (Raid), पोलिसांनी एकूण आठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त (Seized).

Sale of illegal country liquor A crime against both

घारगाव: अवैध दारू विक्रेत्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी (दि.२८) छापे टाकून कारवाई केली. याप्रकरणी दोघांवर घारगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिक-पुणे महामार्गावर साकुर फाटा परिसरात देशी व गावठी दारूची अवैध विक्री होत असल्याची पोलिसांना मिळाली होती. वरुडी फाटा, गुंजाळवाडी येथे बाळू रामभाऊ केदार (वय ५०, रा. पोखरी बाळेश्वर ता. संगमनेर) याच्याकडे ६ हजार ९३० रुपये किमतीच्या देशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या. साकुर फाटा येथे अरविंद अशोक नट (रा. मुंगीरगाव ता. साबला, जि. डुंगरपूर, राजस्थान) हा गावठी हातभट्टीची दारू विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी छापा टाकला. मात्र, तो पसार झाला. पोलिसांनी एकूण आठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. पोलिस नाईक राहुल भाऊसाहेब सोळंके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घारगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Sale of illegal country liquor A crime against both

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here