Home अहमदनगर Sai Temple: कोरोनामुळे साई मंदिर दर्शनासाठी ३० एप्रिलपर्यंत बंद

Sai Temple: कोरोनामुळे साई मंदिर दर्शनासाठी ३० एप्रिलपर्यंत बंद

Sai temple closed for darshan till April 30  

शिर्डी | Sai Temple: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाच्या ब्रेक दि चेन या धोरणानुसार सोमवारी सायंकाळपासून ते ३० एप्रिलपर्यंत साई भाविकांना साईमंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती संस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिली आहे.

साई संस्थानची भक्तनिवास व्यवस्था या कालावधीत बंद असणार आहे. प्रसादालय व बाहेरून येणाऱ्या भाविकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रसादालयात केवळ कोविड सेन्टरच्या रुग्णांसाठी जेवण बनविले जाणार आहे. अशी माहिती ठाकरे यांनी दिली. यावेळी मुख्य लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे, प्रशासकीय अधिकारी डॉ. आकाश किसवे, वैद्यकीय संचालक डॉ. प्रीतम वडगावे, डॉ. मैथिली पितांबरे, मंदिर प्रमुख रमेश चौधरी तसेच विविध विभागांच्या प्रमुखांची उपस्थिती होती.  साई संस्थानच्या इतिहासात संसर्ग रोखण्यासाठी मंदिर भाविकांना तिसर्यांदा दर्शनासाठी बंद ठेवण्यात येत आहे.

Web Title: Sai temple closed for darshan till April 30

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here