लोकांना रोज भेटायला मी सरपंच नाही, खासदार आहे जिल्ह्यातील या खासदाराचे प्रत्युत्तर
अहमदनगर: शिर्डी लोकसभा मतदार संघाचे शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे (Sadashiv lokhande) हे मतदारसंघात कधीतरीच दिसतात, ते लोकांना भेटत नाही अशी मागील काही काळापासून लोकांची तक्रार आहे. त्यांच्यावरील या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे ते म्हणाले गावचे सरपंच लोकांना रोज भेटू शकतात. मी सरपंच नव्हे तर खासदार आहे. मी रोज भेटत नसलो तरी मतदारसंघासाठी माझी कामे सुरूच आहे.
शिर्डीत कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. खा. लोखंडे हे शिर्डी मतदारसंघातून निवडून आलेले असले तरी त्यांचे वास्तव्य मुबई व दिल्ली येथेच असते. मागील काही काळापासून ते भेटत नसल्याच्या तक्रारी होत असतात. कोरोना संकट काळात सुरुवातीच्या वेळेस ते भेटायला आले नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. नेवासा आढावा बैठकीत त्यांच्यावर शाई फेकण्याचा प्रयत्न झाला होता. या टीकेवर विचारले असता लोकसभेचे अधिवेशन, इतर बैठका यासाठी वर्षातील सुमारे दोनशे दिवस दिल्लीतच जातात. उरलेल्या काळात मतदारसंघासाठीची कामे सुरू असतात. मी भेटलो नाही, याचा अर्थ असा होत नाही की, मी काम करीत नाही, माझे काम सुरूच असते. गावचा सरपंच रोज भेटू शकतो, मी सरपंच नाही, खासदार आहे. सर्वसामान्य जनतेला हे माहिती आहे. त्यांचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे, असेही लोखंडे यावेळी म्हंटले.
Web Title: Sadashiv lokhande to people Meet Answer