बैलाच्या वाढदिवसाला ‘सबसे कातील गौतमी पाटील’
Gautami Patil: स्टार गौतमी पाटील या कार्यक्रमात आली होती, तिला पाहण्यासाठी गर्दीही झाली होती.
सातारा: सबसे कातील गौतमी पाटील ही ओळख असलेली नृत्यांगना आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर तिचे लाखो चाहते आहेत. मात्र आता तिला एका बैलाच्या वाढदिवसाला प्रमुख पाहुणी म्हणून निमंत्रण देण्यात आलं. हे निमंत्रण गौतमीने स्वीकारलं. तिने स्वतः पोस्ट करत ही माहिती दिली. साताऱ्यात एका पैलवानाने आपल्या लाडक्या बैलाच्या वाढदिवशी गौतमी पाटीलला निमंत्रण दिलं. तिने या वाढदिवस कार्यक्रमात लावणी सादर करावी असं या पैलवानाने सांगितलं जे निमंत्रण गौतमी पाटीलने स्वीकारलं आणि ती कार्यक्रमाला उपस्थित राहून डान्स ही केला. बैलाच्या वाढदिवसाला गौतमी पाटील सायंकाळी सात वाजता उपस्थित राहिली होती. सातारा जावळीतील खर्शी येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बैलगाडा मालक आणि पैलवान म्हणून प्रसिद्ध असलेल्या सतीश भोसले यांनी हे आयोजन केलं. आश्विन नावाचा बैल हा महाराष्ट्र चॅम्पियन असून त्याच्याच वाढदिवसाच्या निमित्ताने हे आयोजन करण्यात आलं होत. गौतमी पाटीलला पाहण्यासाठी तरुणाईची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.
यावर्षी त्यांनी चक्क गौतमी पाटीलला बोलावल्याने याची राज्यात चर्चा सुरू झाली आहे. याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. आश्विन नावाचा बैल हा महाराष्ट्र चॅम्पियन असून त्याच्याच वाढदिवसाच्या निमित्ताने हे आयोजन करण्यात आलं. गौतमी पाटीलला पाहण्यासाठी तरुणाईची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.
दरम्यान, गौतमी पाटील ही तिच्या डान्समुळे अनेदा वादात सापडली आहे. त्यावरून तिने अनेकदा माफीही मागितली आहे. मात्र गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमांवर त्याचा कुठलाही परिणाम झालेला नाही. उलट तिच्या कार्यक्रमांना मागणी वाढत गेली.
Web Title: Sabse Katil Gautami Patil on Bull’s birthday
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App