साईभक्तांसाठी महत्त्वाची बातमी, साई दर्शनासाठी येताना करावं लागणार या नियमांचं पालन
Shirdi News: शिर्डीतल्या साईबाबा संस्थाननेही सतर्कतेचे उपाय सुरु केले आहेत. साईबाबांच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांसाठी साईबाबा संस्थानने आवाहन केलं आहे.
अहमदनगर : चीनसह संपूर्ण जगभरात पसरलेली कोरोनाची नवी लाट पसरत आहे. भारतातही येण्याची शक्यता आहे. तिचा मुकाबला करण्यासाठी योग्य खबरदारी घेण्याची गरज आहे. त्या दृष्टीने आता शिर्डीतल्या साईबाबा संस्थाननेही सतर्कतेचे उपाय सुरु केले आहेत. साईबाबांच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांसाठी साईबाबा संस्थानने आवाहन केलं आहे.
दर्शनाला येताय, हे नियम पाळा
दर्शनाला येणाऱ्या साई भक्तांनी मास्क वापरावा, सोशल डिस्टनसिंगसह सॅनिटायझरचा वापर करावा, ज्यांनी बूस्टर डोस घेतलेले नसतील त्यांनी ते घ्यावेत, कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काळजी घ्यावी
साई संस्थानचे प्रभारी कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी हे आवाहन केलं आहे. कोविडच्या धास्तीने अनेक साईभक्तांच्या चेहऱ्यावर पुन्हा मास्क दिसू लागले आहेत.
दरम्यान (Corona Wave) भारतात गेल्या 24 तासात कोरोनाच्या 145 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यात BF.7 विषाणूची लागण झालेल्या 4 रुग्णांचा समावेश आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारही आता अॅक्शन मोडवर आलं आहे. परदेशी प्रवाशांची विमानतळावर तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लवकरच नवी गाईडलाईन जाहीर होऊ शकते.
IMA ने जारी केली नियमावली
चीनमध्ये ओमायक्रॉनचा सब-व्हेरिएंट BF.7 ने धुमाकूळ घातला आहे. भारतातही चिंत वाढली आहे. भारतात या व्हेरिएंटचे 4 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आता केंद्र सरकार सतर्क झालं आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) ने नियमावली जाही केली आहे.
सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरा, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळा, सॅनिटायझर आणि साबनाने हात स्वच्छ करा , राजकीय आणि सामाजिक कार्यक्रमांना जाणं टाळा, आंतरराष्ट्रीय यात्रा करत असाल तर सावधगिरी पाळा, ताप, घसा खवखवणे, खोकला अशी लक्षणं आढळली तर तात्काळ डॉक्टरांकडून तपासून घ्या, लसीकरण झालं नसेल तर तातडीने करुन घ्या, बूस्टर डोस घ्या.
जाहिरात: आपल्या स्वप्नातील घर घ्या, भाडे भरण्यापेक्षा हप्ता भरा आणि स्वतःच्या घराचे मालक व्हा!!! तसेच इतर तारण कर्जासाठी संपर्क करा.- SRM-India Shelter Finance Corporation. भागीरथ पानसरे मोबा. 8975489830/7414971196 👉Home loan 👉LAP 👉purchase + Construction ETC. सिबिल प्रॉब्लेम असेल तरी संपर्क करा.
Web Title: rules have to be followed while coming for Sai Darshan
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App