संगमनेरात प्रसिद्ध व्यापाऱ्याच्या घरावर पिस्तुलाचा धाक दाखवून दरोडा
Sangamner Robbery: पिस्तुलाचा धाक दाखवून 2 लाख 60 हजार रुपये रोख, साडेनऊ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व एक मोबाईल असा 4 लाख 60 हजार रुपयांचा ऐवज लुटला.
संगमनेर: शहरातील अतिशय गजबजलेल्या नाशिक -पुणे महामार्गावरील संगमनेर बस स्थानकापासून जवळच्या अंतरावर असलेल्या व्यापार्याच्या घरावर चोरट्यांनी दरोडा टाकल्याची घटना प्रजासत्ताक दिनी रात्री पावणे आठ वाजेच्या सुमारास घडली. दरोडेखोरांनी घरातील महिला व मुलांना चाकू, कोयते व पिस्तुलाचा धाक दाखवून 2 लाख 60 हजार रुपये रोख, साडेनऊ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व एक मोबाईल असा 4 लाख 60 हजार रुपयांचा ऐवज लुटला (Theft). या दरोड्यामुळे पोलिसांची चांगलीच नाचक्की झाली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, नाशिक -पुणे महामार्गावरील सह्याद्री विद्यालया जवळ केदारनाथ भंडारी या व्यापार्याचे विविध व्यवसाय व निवासस्थान आहे. गुरुवारी रात्री पावणे आठ वाजेच्या सुमारास अज्ञात सशस्त्र दरोडेखोरांनी भंडारी यांच्या निवासस्थानावर दरोडा टाकला. या सहा ते सात दरोडेखोरांनी चाकू, कोयते, पिस्तुल या हत्यारांची दहशत दाखवून आपला कार्यभाग उरकला.
दरोडेखोरांचा धुमाकूळ सुरू असताना समोरच्या महामार्गावर माणसांची वर्दळ होती. मात्र चोरट्यांनी भंडारी यांच्या आतील भागात असलेल्या निवास्थानात दरोडा टाकल्याने आत काय चालू आहे. याची कल्पना बाहेरील कोणालाही आली नाही. व्यापारी केदारनाथ भंडारी यांच्या घरात त्यांची पत्नी शोभना, मुलगा पार्थ व त्याचा मित्र प्रणव तिघेच होते. घरात शिरताच दरोडेखोरांनी दोन्ही मुलांना पिस्तुलाचा धाक दाखवून त्यांना मारहाण (Beating) करुन दहशत निर्माण करण्यास सुरुवात केली. यावेळी एका मुलाला दरोडेखोरांनी बांधुन ठेवले होते. यानंतर दरोडेखोरांनी त्यांच्या घरातील कपाटात ठेवलेल्या रोकडसह तब्बल साडेनऊ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने घेवून पोबारा केला.
दरोडेखोर पळून गेल्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती समजताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पंचनामा केला.
याबाबत शोभना केदारनाथ भंडारी यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा रजिस्टर नंबर 85/2023 भारतीय दंड संहिता कलम 452, 394 प्रमाणे गुन्हा दाखल (Filed a Case) केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव हे करीत आहे.
दरोड्याची माहिती मिळतात शहरातील अनेक व्यापार्यांनी रात्री शहर पोलीस ठाणे गाठले. त्यांनी पोलिसांची चर्चा केली. यानंतर रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी या चोरीचा तपास सुरू केला आहे. भंडारी यांच्या एकही सीसीटीव्ही कॅमेरा नाही, यामुळे पोलिसांनी अन्य ठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेरा मधील फुटेजची तपासणी सुरू केली आहे. संगमनेर शहर व परिसरात गेल्या काही महिन्यांपासून दरोड्याचे प्रमाण वाढलेले आहे. चोरट्यांची दहशत आता शहरातही दिसू लागली आहे. रात्री बारानंतर होणार्या चोर्या आता आठ वाजताच होऊ लागल्याने पोलिसांचे गुन्हेगारांवर असणारे वर्चस्व संपल्याचे दिसत आहे.
Web Title: Robbery at gunpoint at the house of a famous businessman in Sangamner
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App