Satyajeet Tambe : फक्त सांगा! चार तासांमध्ये उमेदवार निवडून आणण्याची आमच्यात ताकद- विखेंचे विधान
Nashik Graduate Constituency Election: Satyajeet Tambe; खा.विखे यांनी एक विधान चर्चेत आले आहे.
नाशिकः नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी अपक्ष उमेदवार म्हणून सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) रिंगणात आहेत. तांबेंना भाजपची मदत मिळेल, अशी शक्यता असतांना खासदार सुजय विखे यांचं एक विधान राज्यात चर्चेत आलेलं आहे. खा.विखे यांनी एक विधान चर्चेत आले आहे.
नाशिक पदवीधर मतदारसंघाकडे राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे. अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांना काँग्रेसने डावलून त्यांचे वडील सुधीर तांबे यांना एबी फॉर्म दिला. मात्र सुधीर तांबेंनी अर्ज भरला नाही. मुलगा सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.
काँग्रेस पक्षाने पिता-पुत्रावर कारवाई केली आहे. या निवडणुकीमध्ये सत्यजीत तांबे यांना भाजपची रसद मिळणार, असं सांगितलं जात असतांना नगरचे खासदार सुजय विखे यांचं एक विधान चर्चेत आलेलं आहे. सुजय विखे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं तर आम्ही चार तासात एखाद्या उमेदवाराला निवडून आणू असं ते म्हणाले. खासदार सुजय विखे हे आज अहमदनगरमध्ये माध्यमांशी बोलत होते.
खा. सुजित विखे यांचे विधान:
‘नगर जिल्हा भाजप कार्यकर्त्यांची एवढी ताकद आहे की, आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी रात्री १२ वाजता जरी सांगितलं तरी आम्ही एखादा उमेदवार निवडून आणू शकतो. फक्त चार तासांमध्ये उमेदवार निवडून आणण्याची आमच्यात ताकद आहे. ३० तारखेला मतदान आहे. आम्हाला २९ च्या रात्री १२ वाजता जरी सांगितलं तरी उमेदवार निवडून आणू शकतो.’ असं विखे म्हणाले.
Web Title: just tell me We have the power to elect candidates in four hours Vikhe’s statement
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App