संगमनेर: रिक्षा अडवून चालकास मारहाण करून लुटले, रस्ता लुटीच्या घटनेने खळबळ
Ahmednagar | Sangamner News: अज्ञात इसमांनी रिक्षा अडवून रिक्षा चालकास कोयत्याने व लाकडी दांड्याने मारहाण, १ लाख ३५ हजार रुपये लुटल्याची घटना.
संगमनेर: संगमनेर तालुक्यात रस्ता लुटीची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे, चार अज्ञातांनी रिक्षाचालकास मारहाण करीत लुटले आहे. नाशिक-पुणे महामार्गावर संगमनेरातील कर्जुले पठार परिसरात कारमधून आलेल्या चार अज्ञात इसमांनी रिक्षा अडवली, रिक्षा चालकास कोयत्याने व लाकडी दांड्याने मारहाण केली. त्याच्याकडील १ लाख ३५ हजार रुपये लुटल्याची घटना गुरुवारी (१९ ऑक्टोबर) दुपारी घडली.
राजकुमार श्रीरंग भालके (वय ४३, हल्ली रा. माळवाडी, पुणे) यांच्या फिर्यादीवरून घारगाव पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत घडलेली माहिती अशी की, भालके हे रिक्षातून शिर्डी येथे पेढा बनविण्याच्या मशिनची डिलिव्हरी देण्यासाठी गेले होते. ते पुन्हा माघारी जात असताना, चार अज्ञात चोरट्यांनी रिक्षाच्या काचा फोडून भालके यांना बेदम मारहाण करीत लुट केली आहे.
Web Title: rickshaw was intercepted and the driver was beaten and robbed
See Latest Marathi News, Ahmednagar News and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App