Home Accident News घोटी-सिन्नर राज्य महामार्गावर रिक्षा-कंटेनरचा अपघात; ३ जणांचा मृत्यू

घोटी-सिन्नर राज्य महामार्गावर रिक्षा-कंटेनरचा अपघात; ३ जणांचा मृत्यू

Breaking News | Nashik Accident: घोटी सिन्नर राज्य महामार्गावरील एसएमबीटी हॉस्पिटलजवळ झालेल्या अपघातात ३ जण ठार.

Rickshaw-container accident on Ghoti-Sinnar State Highway 3 people died

सिन्नर:  घोटी सिन्नर राज्य महामार्गावरील एसएमबीटी हॉस्पिटलजवळ झालेल्या अपघातात ३ जण ठार झाले असून २ जण गंभीर जखमी झाले आहेत. ओव्हरटेक करणाऱ्या MH 05 FW 0030 क्रमांकाची रिक्षा सायंकाळच्या सुमारास सिन्नरकडे जात असतांना सिन्नरहुन घोटीकडे समोरून येणाऱ्या NL 01 AF 0458 कंटेनरला रिक्षाने धडक दिली. यामुळे रिक्षा आणि कंटेनरमध्ये भीषण अपघात झाला. ह्या अपघातात एका बालिकेसह ३ जण ठार झाले आहेत.

अपघाताची माहिती मिळताच महामार्ग सुरक्षा पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक राम व्होंडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना एसएमबीटीच्या रुग्णवाहीकेतुन हॉस्पिटलमध्ये दाखल केले. रिक्षाचालक अमोल विनायक घुगे, वय २५ रा. नांदवली, कल्याण हा जागीच ठार तर स्वरा अमोल घुगे वय ४, मार्तंड पिराजी आव्हाड वय ६० यांचा उपचार सुरु असतांना मृत्यू झाला. प्रतीक्षा अमोल घुगे वय २२, कलावती मार्तंड आव्हाड वय ५८, रा. कल्याण हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.

ट्रकचालक राहुल कुमार प्रजापती वय २८ रा. झारखंड याला सहायक पोलीस निरीक्षक राम व्होंडे यांनी पुढील तपासासाठी वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांच्या ताब्यात दिले आहे. सदर ठिकाणी झालेले अपघात स्थळ हे ब्लॅक स्पॉट नसुन सदर अपघात हा रिक्षा चालकाने ओव्हरटेक केल्यामुळे झाला असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक राम व्होंडे यांनी दिली आहे. अपघातानंतर रस्त्यावरील दोन्ही अपघातग्रस्त वाहने बाजुला करून वाहतुक सुरळीत करण्यात आली. अपघाताबाबत वाडीवऱ्हे पोलीस पुढील तपास करीत आहे.

Web Title: Rickshaw-container accident on Ghoti-Sinnar State Highway 3 people died

See also: Latest Marathi News,  Breaking News liveSangamner NewsAhmednagar News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here