तेलंगणात कॉंग्रेसच्या या नेत्यानी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ, पंतप्रधान मोदींनी केले अभिनंदन
Chief Minister in Telangana: काँग्रेस नेते रेवंत रेड्डी यांनी आज तेलंगणाचे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
तेलंगणा: तेलंगणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर काँग्रेस नेते रेवंत रेड्डी यांनी आज तेलंगणाचे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. तसेच भट्टी विक्रमार्क यांनी उपमुख्यमंत्री म्हणून तर इतर ११ आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह काँग्रेसच्या इतर प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत हा शपथविधी सोहळा पार पडला. नवनिर्वाचित मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनीही रेड्डी यांचं अभिनंदन केलं आहे. तसंच तेलंगणाच्या विकासासाठी सहकार्य करण्याचं आश्वस्त केलं आहे.
“तेलंगणाचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणाऱ्या रेवंत रेड्डी यांचं अभिनंदन. राज्याचा विकास करण्यासाठी आणि तेथील नागरिकांचे कल्याण करण्यासाठी शक्य असलेले सर्व सहकार्य केले जाईल, असा विश्वास मी देतो.” असे एका पोस्टमध्ये लिहिले आहे.
Web Title: Revant Reddy Congress leaders took oath as Chief Minister in Telangana
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App