Home अहमदनगर रेखा जरे हत्याकांड, या तारखेला सुनावणी, सर्व आरोपींना हजर राहण्याचा आदेश

रेखा जरे हत्याकांड, या तारखेला सुनावणी, सर्व आरोपींना हजर राहण्याचा आदेश

Rekha Jare Murder Case: न्यायालय : जामीनावरील सहआरोपींची हजेरी.

Rekha Jare murder Case hearing on this date

अहमदनगर : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांड प्रकरणावर पुढील सुनावणी येत्या १६ सप्टेंबर रोजी होणार आहे. पुढील सुनावणीच्या वेळी सर्व आरोपींना हजर राहण्याचा आदेश जिल्हा न्यायालयाने दिला आहे.

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी बाळ बोठे याच्यासह इतर दोन आरोपींनी केलेल्या अर्जावर २४ ऑगस्ट रोजी जिल्हा न्यायालयात सुनावणी झाली होती. त्यावेळी पुढील सुनावणीस सर्व आरोपींना हजरकरण्याचा आदेश न्यायालयाने दिला होता. परंतु, पोलीस बंदोबस्ताअभावी सर्व आरोपी मंगळवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी हजर नव्हते.

या प्रकरणातील अन्य आरोपी सागर भिंगारदिवे व आदित्य चोळके या दोघांनी केलेल्या जामीन अर्जावर युक्तिवाद झाला. सरकारी पक्षाने दोघा आरोपींना जामीन देण्यास विरोध केला. या प्रकरणातील जामिनावर असलेले आरोपी सुनावणीस हजर होते. परंतु, मुख्य आरोपी बंदोबस्ताअभावी हजर राहू शकले नाहीत. त्यामुळे या प्रकरणावर येत्या १६ सप्टेंबर रोजी सुनावणी घेण्याचा निर्णय देण्यात आला आहे. मयत रेखा जरे यांचा मुलगा मृणाल जरे यांच्या वतीने अॅड. सचिन पटेकर यांनी बाजू मांडली.

Web Title: Rekha Jare murder Case hearing on this date

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here