Rape | प्रेमाच्या जाळ्यात ओढून महिलेवर वारंवार बलात्कार

अमरावती | Amravati: तिवसा येथील एका ४० वर्षीय व्यक्तीविरुद्ध तिवसा पोलीस ठाण्यात बलात्काराचा (rape) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. महिलेला लग्नाचे आमिष देवून त्याने बलात्कार केल्याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
नंदू राऊत (४०, रा. तिवसा) असे आरोपीचे नाव आहे. नंदू राऊतने एका महिलेला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि तिला लग्नाचे आमिष देवून तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध (Sexual relation) प्रस्थापित केले. मागील एक ते दीड वर्षांपासून विवाहित महिलेशी त्याने तिवसा व अमरावती येथे शारीरिक संबंध प्रस्थापित केले असून आता लग्नास नकार दिल्याने पीडित महिलेने तिवसा पोलिस ठाणे गाठून नंदू राऊत विरुद्ध बलात्कार केल्याबाबतची तक्रार दाखल केली आहे.
Web Title; rape of a woman in a love trap

















































