रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलेवर अत्याचार; निर्जनस्थळी नेलं अन्…
Breaking News | Amravati Crime: यात्रेतून घरी परतणाऱ्या महिलेला जीवे मारण्याची धमकी देऊन अत्याचार केल्याची घटना. (Rape Case)
अमरावती : राज्यात महिलांवरील अत्याचार घटना सातत्याने वाढतच आहे. त्यातच आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. धारणी येथील कारा गावात आयोजित यात्रेतून घरी परतणाऱ्या महिलेला जीवे मारण्याची धमकी देऊन अत्याचार केल्याची घटना मंगळवारी (दि. 18) सायंकाळी सातच्या सुमारास घडली. याप्रकरणी 45 वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून धारणी पोलिसांनी आरोपी शिवलाल छोटेलाल धांडे (वय 21, रा. रक्षा, धारणी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
धारणी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रक्षा येथे राहणारी महिला आपल्या दोन मुलांसह दुचाकीवर ट्रिपलसीट कारागाव येथे आयोजित यात्रेला गेली होती. तेथून परतत असताना महिलेने भांडे विकत घेतले होते. दुचाकीवर जागा नव्हती. त्यामुळे महिलेने आपल्या दोन्ही मुलांना दुचाकीवर पाठवले आणि ती पायी येत होती. यावेळी आरोपी शिवलाल तिच्या मागून आला. मी तुझ्या पाठीशी आहे, तू घाबरू नकोस असे त्या महिलेला म्हणाला.
यानंतर काही अंतरावर पायी जात असताना अचानक आरोपीने महिलेला बळजबरीने रस्त्याच्या कडेला नेले व जीवे मारण्याची धमकी देऊन अत्याचार केला व घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेनंतर महिलेने धारणी पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याने पोलिसांनी आरोपी शिवलालविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
Web Title: Rape Case Woman attacked while walking on the road