नात्याला काळीमा फासणारी घटना: सख्ख्या काकानेच केले अल्पवयीन पुतणीला गरोदर
Dhule Crime News: अल्पवयीन पुतणीवरच काकाने वारंवार अत्याचार (Rape) करीत तिला गरोदर केल्याचा प्रकार उघडकीस आला.
धुळे: जिल्ह्यात नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या अल्पवयीन पुतणीवरच काकाने वारंवार अत्याचार करीत तिला गरोदर केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शिरपूर तालुक्यातील एका पाड्यावर ही धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी शिरपूर तालुका पोलिसांत काकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. घटनेनंतर काका फरार झाला असून पोलिसांनी त्याचा कसून शोध सुरू केला आहे.
याबाबत पाड्यावर राहणाऱ्या पीडितेच्या आईने शिरपूर तालुका पोलिसांना फिर्याद दिली. त्यानुसार, त्यांची मुलगी शेतात पाणी भरण्यासाठी व गायीला चारा कापायला गेली असता तेथे मुलीचा काका बाट्या चतुरसिंग पावरा (वय ४०) हा आला. त्याने तिला धमकी देवून तिच्यावर कपाशीच्या शेतात अत्याचार केला.
चार महिन्यांपूर्वी ही घटना घडली. त्यामुळे पिडीतेला दिवस राहिले, त्यात तिचे पोट पुढे आल्याने तिच्या आईला शंका आली. त्यांनी मुलीला विश्वासात घेत विचारपूस केली असता हकीकत सांगितली. काकानेच अत्याचार केल्याचे सांगितल्याबरोबर कुटुंबियांना मोठा धक्का बसला. पीडितेच्या आईने बाट्या पावराविरुद्ध काल पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.
Web Title: Rape Case Sakhkhya’s uncle who got his minor nephew pregnant
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App