Home क्राईम धक्कादायक! नववीत शिकणारी अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली अन्…

धक्कादायक! नववीत शिकणारी अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली अन्…

Crime News: रिक्षा चालकाने शाळकरी मुलीशी गट्टी जमवत  तिच्याशी जवळीक साधत बलात्कार (Rape) केल्याची धक्कादायक घटना.

Rape Case minor girl in ninth grade got pregnant and

मुंबई:  मुंबई उपनगरातील मीरा रोडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने मीरा रोड हादरलं आहे. या घटनेत एका रिक्षा चालकाने शाळकरी मुलीशी गट्टी जमवत  तिच्याशी जवळीक साधत बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर शाळकरी मुलगी  ही तीन महिन्याची गर्भवती राहिली होती. आता आरोपी रिक्षाचालक हा फरार झाला होता. या प्रकरणी आता पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर आरोपी 20 वर्षीय रिक्षाचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, पीडीत मुलगी ही मीरा रोड भागात राहत होती. ती इयत्ता नववीत शिकत होती. या दरम्यान एका दुकानाच्या माध्यमातून तिची आरोपी रिक्षाचालकाशी ओळख झाली होती. या ओळखीनंतर रिक्षाचालकाच्या मनात काही वेगळचं शिजत होते. त्यामुळे आरोपी रिक्षाचालकाने पीडीत शाळकरी मुलीशी ओळख वाढवायला सुरूवात केली होती.

आरोपी रिक्षाचालकाने पीडीत मुलीशी ओळख वाढवून तिच्याशी चांगली मैत्री केली होती. या मैत्रीनंतर तिने शाळकरी मुलीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे आरोपी रिक्षाचालकाला शाळकरी मुलगी ही अल्पवयीन असल्याची माहिती असून देखील त्याने तिच्यासोबत शारीरिक संबध ठेवले.

ऑगस्ट 2023 च्या महिन्यात आरोपी रिक्षाचालकाला मुलीच्या घरी कुणीच नसल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार आरोपी रिक्षाचालक हा संधी साधून तिच्या घरी गेला. यावेळी तिच्याच घरात जाऊन त्याने तिच्याशी बळजबरीने संबंध ठेवले होते. या घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. त्यानंतर आता ही मुलगी तीन महिन्याची गर्भवती राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.

या प्रकरणी आता पीडीतेच्या कुटुबियांनी 25 डिसेंबरला आरोपी रिक्षाचालकाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी रिक्षाचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी रिक्षाचालक हा उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे. बलात्काराच्या घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. या प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक तुकाराम सुकुंड या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Rape Case minor girl in ninth grade got pregnant and

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here