माजी सरपंचाकडून १५ वर्षीय मुलीवर अत्याचार, अभ्यासाच्या बहाण्याने बोलवत
Breaking News | Thane Rape Crime: माजी उपसरपंचाने ओळखीतल्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
ठाणे | मुरबाड : ठाण्यातील मुरबाडमध्ये माजी उपसरपंचाने ओळखीतल्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. त्यानंतर पीडित मुलीने कीटकनाशक पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर हा प्रकार उघड झाला आहे.
मुरबाडच्या नारिवली गावचा माजी उपसरपंच दयानंद भोईर याने त्याच्याच परिसरात राहणाऱ्या दहावीत शिकणाऱ्या एका १५ वर्षीय मुलीला अभ्यासाचं मार्गदर्शन करण्याच्या बहाण्याने बोलावून आधी तिचा विनयभंग केला आणि त्यानंतर तिला गावातल्या एका पडीक घरात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. या प्रकारानंतर पीडित मुलीने कीटकनाशक पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. मुलीच्या कुटुंबीयांनी तिला विश्वासात घेऊन विचारणा केली असता तिने दयानंद भोईर याने आपल्यावर बलात्कार केल्याची माहिती दिली. यानंतर मुलीच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून मुरबाड पोलीस ठाण्यात दयानंद भोईर याच्याविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिकचा तपास करत आहेत.
Web Title: Rape case 15-year-old girl abused by former sarpanch